SCO Summit 2022: गलवान संघर्षानंतर PM मोदी अन् शी जिनपिंग आमनेसामने, पुतीन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक

उझबेकिस्तानमधील समरकंद या ऐतिहासिक शहरात होणाऱ्या शिखर परिषदेत लोकांच्या नजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर असतील.
SCO Summit 2022
SCO Summit 2022ANI
Published on
Updated on

SCO Summit 2022: युक्रेन-रशिया संघर्ष आणि तैवान संकट यासह विविध जागतिक घडामोडींमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या राज्य प्रमुखांच्या परिषदेची 22 वी बैठक आज समरकंद, उझबेकिस्तान येथे सुरू होणार आहे. उझबेकिस्तानमधील समरकंद या ऐतिहासिक शहरात होणाऱ्या शिखर परिषदेत लोकांच्या नजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर असतील.

गलवान व्हॅली सीमेवर दोन्ही देशांमधील संघर्षानंतर पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग 2020 मध्ये पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. हे दोन्ही नेते एससीओ समिटमध्ये सहभागी होणाऱ्या इतर नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर बसलेले दिसतील. पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स परिसरातून भारतीय आणि चिनी सैन्याला हटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा वेळी हे दोन दिग्गज नेते आमनेसामने येतील.

PM मोदी पुतीन यांची भेट घेणार

SCO शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर PM मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा अजेंडा व्यवसाय आणि राजकारण असेल. रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पीएम मोदींसह समरकंदमध्ये अनेक सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

SCO Summit 2022
PM मोदींच्या हस्ते 'डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट' चे उद्घाटन

अधिकृत रशियन वृत्तसंस्था TASS ने राष्ट्रपतींचे सहकारी युरी उशाकोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींसोबतची चर्चा आंतरराष्ट्रीय अजेंड्यावरही होण्याची शक्यता आहे. ते सामरिक स्थैर्य आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थितीवरही चर्चा करतील. संयुक्त राष्ट्र, G20 आणि SCO सारख्या प्रमुख बहुपक्षीय स्वरूपांमध्ये सहकार्यावर चर्चा होईल.

परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्जिओयेव आणि इतर काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संभाव्य भेटीबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या समरकंद दौऱ्याचा कालावधी सुमारे 24 तासांचा असेल. या परिषदेत चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 22 व्या राष्ट्र प्रमुखांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी संध्याकाळी समरकंद येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्जिओयेव यांच्या निमंत्रणावरून आलेले पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर देशाचे पंतप्रधान अब्दुल्ला आरिफॉव्ह, अनेक मंत्री आणि समरकंदचे राज्यपाल यांनी स्वागत केले. यावेळी उझबेकिस्तानचे अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

SCO Summit 2022
PM Modi | मोदींना पर्यायी चेहरा देण्यात भाजपविरोधी पक्ष यशस्वी होणार का? | Gomantak Tv

"प्रादेशिक शांतता आणि सुरक्षा, व्यापार आणि कनेक्टिव्हिटी, संस्कृती आणि पर्यटन यासह स्थानिक, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO सदस्य देशांच्या नेत्यांसोबत सामील झाले," असे ट्विट MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com