म्यानमारने पिकवली 200 कोटींची अफू, UNDC च्या अहवालातून समोर आल्या धक्कादायक बाबी

Myanmar opium: दक्षिणपूर्व आशियातील अफूची शेती गरिबी, सरकारी सेवांचा अभाव, आव्हानात्मक व्यापक आर्थिक वातावरण, अस्थिरता आणि असुरक्षिततेशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Myanmar opium Production
Myanmar opium ProductionDainik Gomantak
Published on
Updated on

Myanmar grows opium worth 200 crores, UNDC report reveals shocking facts:

भारताचा शेजारी असलेला अफगाणिस्तान हा अफूचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश होता. पण अफगाणिस्तानला मागे टाकत भारताचा दुसऱ्या शेजारी देशाने म्हणजेच म्यानमारने अफूच्या उत्पादनात पहिला क्रमांक पटकावला आहे व अफगाणिस्तानला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार म्यानमारमध्ये दरवर्षी १०८० मेट्रिक टन अफूची पेरणी केली जाते.

युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग्ज अँड क्राइम (UNDC) ने अहवालात लिहिले आहे की, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने 2022 पासून अफगाणिस्तानमध्ये अफूच्या लागवडीवर बंदी घातली आहे.

ही बंदी लागू झाल्यानंतरच अफगाणिस्तानातील अफूचे उत्पादन ९५ टक्क्यांनी घटले. या वर्षी अफगाणिस्तानमध्ये 330 टन अफूचे पीक घेण्यात आले आहे.

दक्षिणपूर्व आशियातील अफूची शेती गरिबी, सरकारी सेवांचा अभाव, आव्हानात्मक व्यापक आर्थिक वातावरण, अस्थिरता आणि असुरक्षिततेशी जवळून संबंधित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Myanmar opium Production
Goa Tourism: गूगलवर 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये गोवा 'या' नंबरवर

म्यानमारमधील अफूचा व्यापार देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावत असल्याचे यूएनडीसीने म्हटले आहे. अलीकडच्या काळात त्यात मोठी वाढ झाली आहे.

पूर्वी म्यानमारमध्ये $1 अब्ज किमतीची अफू पिकवली जात होती, पण आता $2.4 बिलियन किमतीची अफू म्यानमारमध्ये पिकवली जाते आणि विकली जाते. हे देशाच्या जीडीपीच्या 4.1 टक्के आहे.

लाओस आणि थायलंडशी म्यानमारच्या सीमा आहेत. हे क्षेत्र अवैध ड्रग्ज, तस्करी आणि अफूसाठी सर्वात मोठे ठिकाण आहे. गेल्या वर्षी म्यानमारमध्ये ७९० मेट्रिक टन अफूचे पीक घेण्यात आले होते.

Myanmar opium Production
US President पदाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

म्यानमारची सर्वात सुपीक जमीन शान प्रांतात आहे. मात्र, शानच्या ८८ टक्के जमिनीवर अफूची लागवड होते. पूर्व शान क्षेत्रात हेक्टरी 19.8 किलो अफूचे पीक घेतले जात होते, परंतु आता ते 29.4 किलोपर्यंत वाढले आहे.

हा प्रकार संपवण्याचा लष्कराचा कोणताही इरादा नाही, असे जाणकारांचे मत आहे. या वर्षी, म्यानमार केंद्रीय अमली पदार्थ सेवन नियंत्रण समितीने सांगितले आहे की, अफूचा व्यापार संपवून कोणताही फायदा होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com