Hafiz Abdul Salam Bhuttavi: पाकिस्तानात मारला गेलेला भारताचा सर्वात मोठा 'शत्रू' अब्दुल सलाम भुट्टावी कोण होता?

Hafiz Abdul Salam Bhuttavi: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पत्रक जारी करुन याची पुष्टी केली आहे. भुट्टावीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ट्रेनिंग दिले होते.
Hafiz Abdul Salam Bhuttavi Confirmed Deceased
Hafiz Abdul Salam Bhuttavi Confirmed DeceasedDainik Gomantak
Published on
Updated on

Hafiz Abdul Salam Bhuttavi Confirmed Deceased: लष्कर-ए-तैयबा (LET) चा संस्थापक सदस्य आणि हाफिज सईदचा निकवर्तीय हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 7 महिन्यांपूर्वी त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पत्रक जारी करुन याची पुष्टी केली आहे.

भुट्टावीने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ट्रेनिंग दिले होते. विशेष म्हणजे, त्याने आपल्या प्रक्षोभक भाषणांनी त्यांना भडकवले होते. वास्तविक, भुट्टावी याच्या मृत्यूची बातमी दोन वर्षांपूर्वी आली होती, परंतु त्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) ती स्वीकारण्यास नकार दिला होता. लष्करच्या संस्थापकांपैकी एक अब्दुल सलाम भुट्टावी याचा मृत्यू झाल्याचे आता UNSC ने मान्य केले आहे.

हाफिजच्या अनुपस्थितीत दोन्ही संघटना सांभाळायचा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भुट्टावी हाफिज सईदच्या इतका जवळ होता की, जेव्हा भारतीय पोलिसांनी हाफिज सईदला (Hafiz Saeed) नोव्हेंबर 2008-09 मध्ये ताब्यात घेतले तेव्हा भुट्टावीने एलईटी आणि जमात-उद-दावाची धुरा सांभाळली होती. हाफिज सईदला मे 2002 मध्ये ताब्यात घेण्यात आले तेव्हाही तो या दोन्ही संघटनांचा प्रमुख होता.

लष्कर आणि जमात-उद-दावाच्या मदरसा नेटवर्कची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. 2002 मध्ये, त्याने लाहोरमध्ये लष्करचा तळ तयार करण्याची जबाबदारी घेतली होती, परंतु आता भुट्टावी याचे 29 मे 2023 रोजी पंजाब प्रांतातील मुरीदके येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Hafiz Abdul Salam Bhuttavi Confirmed Deceased
Pakistan: कंगाल पाकिस्तानला इस्लामिक स्टेटकडून मोठा धोका; धार्मिक संघर्ष भडकवण्यासाठी...

मुंबई दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये 6 अमेरिकनांचाही समावेश होता

भुट्टावी लष्कर आणि जमात-उद-दावाच्या दहशतवाद्यांना आवश्यक सूचना देत असे. भुट्टावी आणि हाफिज सईद फतवे काढायचे. संयुक्त राष्ट्राने नियुक्त केलेल्या दहशतवादी भुट्टावीने 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या हल्लेखोरांना ट्रेनिंग दिले होते. नोव्हेंबर 2008 मध्ये समुद्रमार्गे मुंबईत (Mumbai) घुसलेल्या 10 दहशतवाद्यांनी मोठा नरसंहार केला होता. या हल्ल्यात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाने घेतली होती. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com