Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

Indian Sailors Injured Hormuz Attack: ओमानच्या किनारपट्टीजवळ आणि महत्त्वाच्या अशा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून जाणार्‍या पनामाचा ध्वज असलेल्या 'एमटी ऑन पीस' या व्यापारी जहाजावर भीषण हल्ला झाला.
MT On Peace Commercial Vessel Attack Strait of Hormuz
MT On Peace Commercial Vessel Attack Strait of HormuzDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

MT On Peace Commercial Vessel Attack Strait of Hormuz: ओमानच्या किनारपट्टीजवळ आणि महत्त्वाच्या अशा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून जाणार्‍या पनामाचा ध्वज असलेल्या 'एमटी ऑन पीस' या व्यापारी जहाजावर भीषण हल्ला झाला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जहाजावर असलेले 12 खलाशी जखमी झाले असून, त्यापैकी 11 जण भारतीय आहेत. या जहाजावर एकूण 19 खलाशी होते, ज्यामध्ये 17 भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

हल्ल्यानंतर ओमानच्या प्रशासनाने आणि तटरक्षक दलाने तात्काळ बचाव कार्य राबवून जखमी खलाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि उपचारासाठी ओमानच्या खासब शहरात दाखल केले. या संकटसमयी भारताने तातडीने मदत केल्याबद्दल ओमानी प्रशासनाचे आभार मानले.

MT On Peace Commercial Vessel Attack Strait of Hormuz
Strait Of Hormuz: अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' रोखण्यावरुन इराणची वॉशिंग्टनला खुली चेतावनी; पेझेश्कियान यांनी सुनावले खडे बोल

भारताने या व्यापारी जहाजावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, या क्षेत्रामध्ये व्यापारी जहाजांवर वारंवार होणारे हल्ले भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे. व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. भारताने या भागात शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी असे हल्ले त्वरित रोखण्याचे आवाहन केले असून, आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरुन होणारी नौवहन वाहतूक आणि व्यापार लवकरात लवकर पूर्ववत करण्याची मागणी केली.

MT On Peace Commercial Vessel Attack Strait of Hormuz
Strait Of Hormuz: होर्मुज सामुद्रधुनीवर कोणाचीच हुकूमशाही चालणार नाही! ट्रम्प यांची आता ओमानला धमकी; म्हणाले, 'पृथ्वीवरुन मिटवून टाकू' VIDEO

यापूर्वीही, भारताकडे (India) येत असलेल्या 'एमव्ही केप दाओ' या व्यापारी जहाजावर 23 सप्टेंबर रोजी ओमानच्या पूर्व किनाऱ्याजवळ हल्ला झाला होता. त्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला होता, तर 19 भारतीय खलाशांना सुखरुप वाचवण्यात आले होते. फॉरवर्ड सीमेन युनियन ऑफ इंडियाने मृत खलाशाची ओळख उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील वायपर सूरज यादव अशी पटवली होती.

MT On Peace Commercial Vessel Attack Strait of Hormuz
Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

युनियननुसार, त्या जहाजावर दोन टॉर्पिडोद्वारे हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटसमयी खलाशांच्या मदतीसाठी 'सीफेअर्स इमर्जन्सी सपोर्ट नेटवर्क' स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला होता. जागतिक व्यापारात खलाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, संकटाच्या काळात त्यांच्या सुरक्षेला आणि मदतीला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com