Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

IRGC Gunboats Firing Container Ship: जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या समुद्रधुनीत पुन्हा एकदा खळबळ उडाली. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका व्यापारी कंटेनर जहाजाला लक्ष्य करण्यात आले.
Strait of Hormuz Ship Attack
IRGC Gunboats Firing Container ShipDainik Gomantak
Published on
Updated on

IRGC Gunboats Firing Container Ship: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून दोन्ही देशांतील चर्चेची दुसरी फेरी रद्द झाल्यानंतर युद्धाचे ढग अधिक गडद झाले. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या समुद्रधुनीत पुन्हा एकदा खळबळ उडाली. ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ एका व्यापारी कंटेनर जहाजाला लक्ष्य करण्यात आले असून या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील ही तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वीचे दोन हल्ले अमेरिकेकडून झाल्याचा दावा केला जात असताना यावेळी मात्र इराणने थेट कारवाई केल्याचे समोर आले.

युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने (UKMTO) दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या ईशान्येला सुमारे 15 सागरी मैलांच्या अंतरावर ही घटना घडली. संबंधित कंटेनर जहाजाच्या कॅप्टनने दिलेल्या अहवालानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) सशस्त्र गनबोट्स वेगाने जहाजाच्या जवळ आल्या. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय या गनबोट्सवरुन जहाजावर भीषण गोळीबार करण्यात आला.

Strait of Hormuz Ship Attack
Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

इराणच्या (Iran) या आक्रमक कारवाईमुळे जहाजाच्या 'कंट्रोल रुम'चे (ब्रिज) प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने, या गोळीबारानंतर जहाजाला आग लागली नाही किंवा कोणत्याही प्रकारची तेलगळती होऊन पर्यावरणाची हानी झाली नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, जहाजावरील सर्व कर्मचारी आणि क्रू सदस्य सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली.

Strait of Hormuz Ship Attack
US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

होर्मुझची समुद्रधुनी ही जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्षाचा केंद्रबिंदू आता हे सागरी क्षेत्र बनले आहे. चर्चेचे दरवाजे बंद झाल्यामुळे इराणने आता व्यापारी जहाजांना लक्ष्य करुन अमेरिकेवर दबाव टाकण्याचे धोरण स्वीकारल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इराणच्या या हल्ल्यामुळे आखाती देशांमधील व्यापारी वाहतूक धोक्यात आली असून जागतिक बाजारपेठेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून आपल्या मित्रराष्ट्रांच्या जहाजांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. या हल्ल्यामुळे या प्रदेशात कधीही पूर्ण क्षमतेने युद्ध पेटू शकते, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com