Morocco Earthquake: मोरोक्कोमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपांत मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 1,037 एवढी झाली असून, 1,200 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. अलजजीराने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
मध्य मोरोक्कोमध्ये देशातील चौथे सर्वात मोठे शहर असलेल्या माराकेशमध्ये 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर विविध शहरांमधील लोक धावत रस्त्यावर आले.
आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, स्थानिक वेळेनुसार काल रात्री 11.11 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे 71 किलोमीटर अंतरावर असलेल्या हाय अॅटलस पर्वतांमध्ये जमिनीपासून 18.5 किलोमीटर खाली होता.
भूकंपानंतर 19 मिनिटांनी 4.9 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला. माराकेश आणि दक्षिणेकडील अनेक भागात भूकंपामुळे अधिक मृत्यू झाले आहेत.
"प्रारंभिक अहवालांनुसार, भूकंपामुळे अल-हौज, माराकेश, ओअरझाझेट, अझिलाल, चिचौआ आणि तरौदान प्रांतांमध्ये जीवितहानी झाली आहे." असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मोरोक्को गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे शहराबाहेरील जुन्या वस्त्यांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत, यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग बनताना दिसत आहेत.
विशेषतः माराकेशमध्ये ज्याला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. येथील अनेक पर्यटकांनी भूकंपानंतर जीव वाचवण्यासाठी लोक धावताना आणि ओरडतानाचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत.
भारताचे पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी मोरोक्कोमध्ये झालेल्या भीषण भूकंपात झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या कठीण काळात भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.