Train Accident: काळजाचा थरकाप! भीषण रेल्वे अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू, 98 हून जखमी; खोल दरीत कोसळले अनेक डबे VIDEO

Train Accident 13 Dead: मेक्सिकोच्या दक्षिण भागातील ओक्साका राज्यात एक भीषण रेल्वे अपघात झाला. या गंभीर अपघाताच्या घटनेने संपूर्ण देश हादरला.
Train Accident 13 Dead
Train AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Mexico Train Crash: मेक्सिकोच्या दक्षिण भागातील ओक्साका राज्यात एक भीषण रेल्वे अपघात झाला. या गंभीर अपघाताच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. एका प्रवासी ट्रेनचे डबे रुळावरुन घसरुन झालेल्या या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 98 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 'इंटरोशियनिक ट्रेन'चा हा अपघात झाला, जी मेक्सिकोच्या प्रशांत महासागर किनारपट्टीला खाडी किनारपट्टीशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर धावत होती. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये 241 प्रवासी आणि 9 कर्मचारी मिळून एकूण 250 लोक प्रवास करत होते.

वेगवान वळणावर डबे घसरले

मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात (Accident) निजांडा शहराच्या जवळ असलेल्या एका तीव्र वळणावर झाला. ट्रेनचा वेग जास्त असताना अचानक या वळणावर इंजिन रुळावरुन घसरले आणि त्यानंतर मागचे काही डबे एका खोल दरीच्या दिशेने झुकले. यातील काही डबे दरीत कोसळले असून काही डबे उलटले. या अपघाताचे स्वरुप इतके भयावह होते की, प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

Train Accident 13 Dead
Assam Train Accident: हत्तीच्या कळपाला धडकली राजधानी एक्सप्रेस, आठ हत्तींचा मृत्यू; ट्रेनही रुळावरुन घसरली

रेल्वेचे संचालन पाहणाऱ्या मेक्सिकन नेव्हीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. लष्कराचे जवान, नागरी संरक्षण पथके आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींपैकी 36 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील 5 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्राध्यक्षांकडून शोक व्यक्त

मेक्सिकोच्या (Mexico) राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शीनबॉम यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर एक संदेश जारी करत म्हटले की, "ही एक अतिशय दुःखद घटना असून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल."

ओक्साकाचे राज्यपाल सलोमोन जारा क्रूझ यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मेक्सिकोच्या अटॉर्नी जनरल कार्यालयाने अपघाताच्या उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. यामध्ये ट्रेनचा वेग, ब्रेक निकामी झाले होते का किंवा रेल्वे ट्रॅकच्या स्थितीत काही दोष होता का, या सर्व बाबींची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता आणि अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Train Accident 13 Dead
Chhattisgarh Train Accident: छत्तीसगढमध्ये मोठा रेल्वे अपघात! लोकल ट्रेनची मालगाडीला जोरदार धडक,10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी; प्रवाशांची धावपळ VIDEO

महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा धक्का

ही रेल्वे लाईन 'इंटरोशियनिक कॉरिडॉर ऑफ द इस्तमस ऑफ तेहुआंतेपेक' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. दक्षिण मेक्सिकोच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि मालवाहतुकीसोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी माजी राष्ट्राध्यक्ष एंड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी हा प्रकल्प सुरु केला होता. या मार्गावर यापूर्वी छोटेमोठे अपघात झाले असले तरी, इतक्या मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Train Accident 13 Dead
Train Accident: धावत्या ट्रेनमधून पडून युवकाचा मृत्यू; दूधसागर येथील धक्कादायक घटना

घटनास्थळावरुन समोर आलेली चित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत, ज्यात रेल्वेचे डबे एकमेकांवर आदळलेले आणि दरीच्या टोकावर लटकलेले दिसत आहेत. बचाव पथक अजूनही ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत आहेत. या अपघाताने आता मेक्सिकोच्या रेल्वे सुरक्षेवर आणि देखभालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com