Mexico Firing Video: मेक्सिकोच्या वॉटर पार्कमध्ये गोळीबार, सात जणांचा मृत्यू!

Mexico Firing Video: मेक्सिकोमध्ये एका वॉटर पार्कमध्ये बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.
Mexico Firing
Mexico Firing Dainik Gomantak

Mexico Firing Video: मेक्सिकोमध्ये एका वॉटर पार्कमध्ये बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सात वर्षांच्या चिमुकल्यासह सात जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला. याशिवाय, एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, पोलीस (Police) कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र, पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगार फरार झाले. या गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये सात वर्षीय अल्पवयीन, तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.

या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. गुआनाजुआटो शहराच्या दक्षिणेस सुमारे 65 किमी (40 मैल) अंतरावर असलेल्या कॉर्टझार या छोट्या गावात असलेल्या रिसॉर्टवर झालेल्या हल्ल्यात सात लोक ठार झाले. व्हिडीओ फुटेजमध्ये हल्ल्यानंतरची स्थिती पाहता येते.

Mexico Firing
Mexico Viral Video: हवेत उडणाऱ्या हॉट एअर बलूनला लागली आग, पर्यटकांनी आकाशातून ठोकली उडी

सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये लोक धावताना, रडताना, किंचाळताना आणि मुलांना मिठी मारताना दिसत आहेत.

मेक्सिकोचे पोलीस आणि तेथील सैनिक हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या गोळीबारामागे कोणाचा हात होता हे अद्याप समजू शकलेले नाही, असे स्थानिक सुरक्षा विभागाने सांगितले. या हल्ल्यात एका सात वर्षांच्या मुलासह तीन पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com