Mexico Bus Accident: कुठे विमान कोसळले तर कुठे बस दरीत पडली; तीन वेगवेगळ्या देशांतील अपघातात 49 जणांचा मृत्यू

Johannesburg's Gas Leak: आफ्रिकेतील वायुगळतीमध्ये सुरुवातीला 24 मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. पण, प्रांतीय सरकारने मृतांची संख्या 16 असल्याचे सांगितले.
Plane Crash
Plane CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Planr Crashed at South Carolina: गुरुवार दि. 6 जुलै रोजी तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल 49 जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये मेक्सिकोत बस दरीत कोसळल्याने चिमुकल्यासह 27 जण मृत्यूमुखी पडले. तर दक्षणि आफ्रिकेतील जोहन्सबर्ग शहरात वायुगळतीमुळे 16 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

दक्षिण कॅरोलिना किनारी रिसॉर्ट शहर मेरिका येथे सिंगल इंजिन असलेले विमान कोसळले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या एका अपघातात 1 जण मृत्यूमुखी पडला.

मेक्सिकोत बस दरीत कोसळली

मेक्सिकोमध्ये बुधवारी एक बस भीषण रस्ते अपघाताची बळी ठरली. या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यातून जात असलेली बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.

ओक्साकाचे गृहमंत्री जीसस रोमेरो यांनी सांगितले की, यामध्ये एक बाळ, 13 पुरुष आणि 13 महिलांचा मृत्यू झाला, तर अन्य 21 जण जखमी झाले. त्यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेत वायुगळती

दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग येथील झोपडपट्टीत बुधवारी संशयास्पद गॅस गळती होऊन १६ जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गॅस गळतीचे प्रकरण जोहान्सबर्गच्या बोक्सबर्ग उपनगराजवळील वस्तीतील आहे, जिथे 16 लोकांचा मृत्यू झाला.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दक्षिण आफ्रिकेच्या सरकारी मालकीच्या एसएबीसीचा हवाला देत सुरुवातीला 24 मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. पण, प्रांतीय सरकारने मृतांची संख्या 16 असल्याचे सांगितले.

Plane Crash
Canada Khalistan Referendum: धक्कादायक! खलिस्तानसाठी कॅनडामध्ये मतदान; भारताच्या इशाऱ्यानंतर ट्रुडो सरकारचे दुर्लक्ष

दक्षिण कॅरोलिनामध्ये विमान कोसळले

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनाच्या किनारी रिसॉर्ट शहरात सिंगल इंजिन असलेले विमान कोसळले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाचे अवशेष रविवारी नॉर्थ मर्टल बीच येथील गोल्फ कोर्सजवळ सापडले.

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये चार प्रवासी आणि पायलटचा समावेश होता. प्राथमिक अहवालात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, नंतर ही संख्या पाच झाली.

हॉरी काउंटी चीफ डेप्युटी कोरोनर तमारा विलीयर्ड यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात नेल्यानंतर एका व्यक्तीचा तात्काळ मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा विमान अपघातात मृत्यू झाला.

मात्र, अद्याप अपघातग्रस्तांची ओळख पटलेली नाही, तसेच विमान कोसळलेले नाही. याची कारणे कळली आहेत.

Plane Crash
Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये भीषण अपघात, 80 फूट खोल दरीत कोसळली बस; 27 जणांचा मृत्यू

कॅलिफोर्नियातही विमान कोसळले

दुसरीकडे, दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये मंगळवारी उड्डाणानंतर काही वेळातच विमान कोसळले, त्यात एक प्रवासी ठार आणि तीन जण जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com