Khalistan Referendum
Khalistan ReferendumDainik Gomantak

Canada Khalistan Referendum: धक्कादायक! खलिस्तानसाठी कॅनडामध्ये मतदान; भारताच्या इशाऱ्यानंतर ट्रुडो सरकारचे दुर्लक्ष

Khalistan: कॅनडाला भारताकडून इशारा देण्यात आला होता की आपल्या देशातील वाढत्या खलिस्तानी कारवायांचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल.
Published on

भारताच्या वतीने खलिस्तानी कारवायांबाबत कॅनडा सरकारकडे चिंता व्यक्त करण्यात आली होती. यावर नियंत्रण न ठेवल्यास द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल, असा इशाराही देण्यात आला होता.

पण एक व्हिडिओ समोर आल्यानंतर कॅनडाच्या सरकारने भारत सरकारने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

वेगळ्या खलिस्तान देशासाठी कॅनडामध्ये सार्वमत घेण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने कॅनडात स्थायिक झालेले शीख बांधव सहभागी झाले होते. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे ज्यामध्ये तरुणाई मतदानासाठी जाताना दिसत आहे.

हा समोर आलेला व्हिडिओ व्हँकुव्हरचा आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. पण, यामध्ये शीख पंजाबीमध्ये 'तुस्सी की लेना? खलिस्तान,' म्हणजे तुम्हाला काय हवे आहे? खलिस्तान.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असे काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत ज्यावर भारतातील पंजाब आणि शिमला राज्यांची नावे लिहिली आहेत. या पोस्टर्समध्ये, या राज्यांमध्ये सार्वमत घेण्याची तारीख 26 जानेवारी दिसत आहे.

Khalistan Referendum
Mumbai High Court: चला पुन्हा या! वकिलाची छोटीशी चूक अन् सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

खलिस्तानी कारवायांमध्ये वाढ

काही काळापासून कॅनडात खलिस्तानच्या कारवाया वाढल्या आहेत. अलीकडेच ओटावा येथील भारतीय दूतावासाबाहेर काही पोस्टर्स लावण्यात आले होते.

या पोस्टर्समध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. टोरंटो आणि व्हँकुव्हरमध्येही अशीच पोस्टर्स लावण्यात आली होती.

Khalistan Referendum
White House मध्ये चाललेयं तरी काय? आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने खळबळ

8 जुलै रोजी या ठिकाणी भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करण्याचीही तयारी आहे. भारतीय तिरंग्याचा अवमान होण्यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत ही भारताची प्राथमिक काळजी आहे.

याशिवाय सीमेवर पॅम्प्लेट्स किंवा इतर गोष्टी चिकटवणे आणि काही शस्त्रे किंवा धोकादायक वस्तू भारतीय राजनैतिक आवारात फेकणे ही देखील मोठी चिंतेची बाब आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com