PM मोदी अन् पोप फ्रान्सिस देणार जगाला शांततेचा संदेश

जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी संयुक्त राष्ट्रांना एक प्रस्ताव सादर केला आहे.
Prime Minister Narendra Modi &      Pope Francis
Prime Minister Narendra Modi & Pope FrancisDainik Gomantak
Published on
Updated on

United Nations: या काळात जगातील अनेक देश एकतर युद्धात अडकले आहेत किंवा युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. तणाव इतका वाढला आहे की शांतता राखणे हे आव्हान ठरत आहे. आता ही जागतिक शांतता प्रस्थापित (global peace commission) करण्यासाठी, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी संयुक्त राष्ट्रांना एक प्रस्ताव सादर केला आहे.

सध्या व्हायरल झालेल्या एका पत्रात आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी आवाहन केले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करावी.

Prime Minister Narendra Modi &      Pope Francis
PM मोदींनी पोप फ्रान्सिस यांची घेतली भेट; भारतभेटीचे दिले निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिया गुटेरेस यांना या समितीत सदस्य बनवण्यात यावे, असे आवाहन या पत्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या तिघांच्या नेतृत्वाखाली जी समिती स्थापन केली जाईल ती जागतिक शांततेसाठी काम करेल. युद्ध झाल्यास संवादाच्या माध्यमातून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

आगामी पाच वर्षे कोणत्याही दोन देशांत युद्ध होऊ नये आणि शांतता कायम राहावी, हा या समितीचा उद्देश असेल. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला प्रस्ताव यूएनकडे नेणार असल्याची माहिती दिली आहे. जगातील प्रत्येक देश त्यांचा प्रस्ताव स्वीकारेल अशी आशा त्यांनी या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

अमेरिका, रशिया आणि चीनसारखे मोठे देशही या प्रस्तावाचे स्वागत करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ओब्राडोर यांच्या मते, जागतिक शांततेसाठी हे सदस्य जे काही सूचना देतील, जग त्यांचे पालन करेल आणि त्यानंतर एक चांगला समाज निर्माण करण्यावर भर दिला जाईल. मात्र या प्रस्तावावर आतापर्यंत इतर कोणत्याही देशाकडून प्रतिसाद आलेला नाही. यूएननेही अशा कोणत्याही प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिलेला नाही. पण मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ज्या उद्देशाने हा प्रस्ताव आणत आहेत ते जगासाठी खूप महत्त्वाचे आहेत.

Prime Minister Narendra Modi &      Pope Francis
पोप फ्रान्सिस ते गोवेकरांचे कौतूक; मोदींचे मतदानासाठी अप्रत्यक्ष आवाहन

सध्या जगातील अनेक देश युद्धामुळे आर्थिक संकटातून जात आहेत, महागाई शिगेला पोहोचली आहे, गरिबी वाढत आहे. अशा परिस्थितीत या परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा आयोगाची गरज आहे, ज्या आयोगाच्या माध्यमातून जागतिक शांततेचा संदेश दिला जाईल. हा आयोग जगाला शांततेचा मार्ग दाखवू शकेल. या कामासाठी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच्यासोबत यूएन प्रमुख आणि पोप फ्रान्सिस यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com