'चीनने कराराचे पालन केले नाही', सीमा वादावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मोठे वक्तव्य

जयशंकर यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ब्राझीलमधील साओ पाउलो येथे भारतीय समुदायाची भेट घेतली.
S. Jaishankar
S. Jaishankar Twitter/@DrSJaishankar

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी रविवारी ब्राझीलमध्ये चीनबाबत मोठे वक्तव्य केले. 'सध्या अशी कोणतीच गोष्ट नाही जी जगापासून लपून ठेवता येईल. आम्ही अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहोत. 1990 च्या दशकात चीनसोबत आमचे काही करार झाले होते. याद्वारे दोन्ही देश प्रतिबंधित भागात सैन्य तैनात करणार नाही,' असे मत जयशंकर यांनी ब्राझीलमध्ये व्यक्त केले. जयशंकर यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ब्राझीलमधील साओ पाउलो येथे भारतीय समुदायाची भेट घेतली.

फुढे बोलताना, 'कोणीही करारांचे उल्लंघन करणार नाही, असे ठरले होते, मात्र चीनने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळेच दोन्ही देशाच्या संबधात अद्यापही दुरावा कायम आहे. आम्ही स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत. देशात विकासाच्या दृष्टीने पाऊलं टाकतांना खूप आशावादी आहे. आणि आपल्या देशाचा विकास करण्यास भारत सक्षम आहे. युक्रेन-रशिया संघर्षादरम्यान आम्ही संघटित प्रयत्नांद्वारे मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढले,' असे मत जयशंकर यांनी ब्राझीलमध्ये व्यक्त केले.

S. Jaishankar
Corona News: जपानचे पंतप्रधान कोविड पॉझिटिव्ह!

जयशंकर यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ब्राझीलमधील साओ पाउलो येथे भारतीय समुदायाची भेट घेतली. येथून ते पॅराग्वे आणि अर्जेंटिना येथेही जातील. या दरम्यान, 'आमचा चीनसोबत 1990 च्या दशकात करार झाला आहे, ज्यात सीमा भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य आणण्यास मनाई आहे. चिन या वारंवार या कराराचे उल्लंघन करत आहे. गलवान व्हॅलीमध्ये काय झाले सगळ्यांना माहित आहे? तो प्रश्न कायम आहे,ट असे सांगत जयशंकर यांनी ड्रॅगनची कानउघडनी केली आहे.

S. Jaishankar
PM Fumio Kishida: जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोरोनाची लागण

कोणत्याही देशाचे संबंध एकतर्फी असू शकत नाहीत. ते टिकवून ठेवण्यासाठी परस्पर आदर असायला हवा. . प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्यासोबत एकोप्याने राहायचे असते. वैयक्तिक जीवनात आणि देश म्हणूनही, परंतु प्रत्येकजण न्याय्य अटींवर एकत्र पुढे जाऊ शकतो. मी तुमचा आदर केला पाहिजे आणि तुम्ही माझा आदर केला पाहिजे,' असे स्पष्ट मत भारत आणि चीनमधील सध्याच्या सीमा परिस्थितीवर बोलताना जयशंकर यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com