Pakistan Flood: पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, शेकडो लोक बेघर

Heavy Monsoon Rain In Pakistan: बलुचिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने महिला आणि मुलांसह 57 लोकांचा मृत्यू झाला.
Heavy Monsoon Rain In Pakistan
Heavy Monsoon Rain In PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात पावसाने जोर पकडला आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो बेघर झाले. देशात मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. बलुचिस्तानच्या दक्षिणेकडील प्रांतात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने महिला आणि मुलांसह 57 लोकांचा मृत्यू झाला. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे आपत्ती आणि गृह व्यवहार सल्लागार झियाउल्ला लँगोव्ह यांनी ही माहिती दिली आहे. पावसाळ्यात आणि पुरात घरे कोसळल्याने शेकडो लोक बेघर झाले आहेत, ते म्हणाले की, मान्सूनचा पाऊस सुरूच आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात (Pakistan) मुसळधार पाऊस पडत आहे. देशातील सर्वात मोठे शहर कराचीचा मोठा भाग पाण्याने तुंबला आहे. दरम्यान, नौदलाने सांगितले की ते नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि बलुचिस्तानला रेशन आणि ताजे पाणी पुरवण्याचे प्रयत्न करत आहेत.

खैबर पख्तुनख्वा प्रांतात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला
जिल्हा अधिकाऱ्याने माहिती दिली की उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतात (Khyber Pakhtunkhwa Provinc) पावसामुळे घर कोसळल्याने सहा वर्षांच्या मुलासह दोन लोक ठार झाले आणि चार जण जखमी झाले.

अफगाणिस्तानातील पुरात 24 ठार

मिळालेल्या मीहितीनुसार अफगाणिस्तानामध्ये (Afghanistan) मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने 24 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

Heavy Monsoon Rain In Pakistan
Sri Lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती 13 जुलैला देणार राजीनामा?

2010 मध्ये आलेला सर्वात भीषण पूर

2010 मध्ये पाकिस्तानमध्ये सर्वात वाईट पूर आला होता. ज्यामुळे 20 दशलक्ष लोकांना पूराचा सामना करावा लागला होता. अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आणि देशाचा एक पंचमांश भाग पाण्याखाली गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com