अफगाणिस्तानच्या (Afganistan Blast) उत्तरेकडील शहर ऐबक येथील एका सेमिनरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये जवळपास 16 जण ठार झाले असून, 24 जण जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी आणि ठार झालेले सर्वजण सामान्य नागरिक आहेत. बुधवारी (दि.30) सामंगन प्रांताची राजधानी ऐबक येथे ही घटना घडली.
टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, समंगनच्या अयबक शहरातील जहादिया मदरसामध्ये दुपारच्या प्रार्थनेदरम्यान हा स्फोट झाला. उत्तर अफगाणिस्तानमधील एका धार्मिक शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 10 विद्यार्थी ठार झाले, असे तालिबानच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. तर, गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नाफी तकोर यांनी सांगितले की, उत्तरी सामंगन प्रांताची राजधानी ऐबक येथे झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत.
आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आमचे सुरक्षा दल गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हे कृत्य कोणी केले असेल. त्याला सोडले जाणार नाही. असे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नाफी तकोर म्हणाले.
याआधी 21 नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका कारमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये काबूलमध्ये आत्मघाती हल्ला झाला होता. यात 51 तरुणींसह किमान 54 लोक मारले गेले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून, सामान्य नागरिकांना लक्ष्य करून अनेक स्फोट झाले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.