जिबूतीनंतर ड्रॅगन आता हिंदी महासागरात बांधणार आणखी एक लष्करी तळ?

चीनने (China) सात वर्षांपूर्वी जिबूतीमध्ये देशाबाहेर पहिला लष्करी तळ बांधला होता.
China
ChinaDainik Gomantak
Published on
Updated on

चीनने सात वर्षांपूर्वी जिबूतीमध्ये देशाबाहेर पहिला लष्करी तळ बांधला होता. जिबूती हिंद महासागरात जिथे एडनचे आखात आणि लाल समुद्र वेगळे होते त्या ठिकाणी आहे. सागरी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. (After Djibouti, China will now build another military base in the Indian Ocean)

दरम्यान, चीन (China) पश्चिम आफ्रिकेत आणखी एक लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अमेरिकेच्या (America) सिनेटच्या समितीमध्ये याबाबतची माहिती या वर्षी मार्चमध्ये आली होती. तिथे लष्करी तळ तयार झाल्यानंतर चीन आपली ताकद आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये (West Asia) वाढवू शकेल, असे त्यात म्हटले आहे. तसेच, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा संतुलनावरही परिणाम होईल.

China
India China Border: सीमेवर ड्रॅगनच्या हालचालीत पुन्हा वाढ

अनेक क्षमतांनी सुसज्ज

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, चीनने आता जिबूतीमध्ये आपला लष्करी तळ विकसित केला आहे. हे विविध प्रकारच्या क्षमतांनी सुसज्ज आहे. आता या लष्करी तळावर तैनातीसाठी सैन्य पाठवणे, जहाजांचे इंधन भरणे आणि नौदलाच्या क्रियाकलापांना मदत करणे अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. चीनने जिबूतीमध्ये लष्करी तळ बांधला तेव्हा तो व्यापाराच्या सुरक्षेसाठी असल्याचे सांगितले. परंतु आता तो इतका मोठा तळ बनला आहे, जिथून चिनी नौदलाची जहाजे आणि पाणबुड्या चालवता येतील.

दुसरीकडे, संरक्षणाशी संबंधित वेबसाइट स्ट्रॅटन्यूज ग्लोबलच्या रिपोर्टनुसार, 2013 मध्ये शी जिनपिंग चीनमध्ये अध्यक्ष झाल्यानंतर देशाबाहेर लष्करी तळ बांधण्याचे धोरण तयार करण्यात आले होते. याच अंतर्गत चीनने जिबूती प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी चीनने जिबूतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. त्या बदल्यात जिबूती प्रशासनाने चीनला तिथे लष्करी तळ बांधण्याची परवानगी दिली.

China
China: शी जिनपिंग 'सेरेब्रल एन्युरिझम' नावाच्या आजाराने ग्रस्त

तसेच, चीन आपला पुढील लष्करी तळ उभारण्याच्या योजनेवर पुढे जात आहे. एप्रिल 2021 मध्ये, आफ्रिकेत तैनात कमांडर जनरल स्टीफन टाऊनसेंड यांनी यूएस सिनेटच्या समितीसमोर साक्ष दिली. त्यात त्यांनी आफ्रिकेत पाय पसरण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, चीनला आफ्रिकेतही असे तळ बांधायचे आहेत, जिथे लढाऊ विमानांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ शकतात.

China
Laos-China Railway: दक्षिण-पूर्व आशियामध्ये चीनचा प्रवेश होणार सोपा

कोमोरोसशी संपर्क साधला

जिबूतीप्रमाणेच चीनने दक्षिण हिंद महासागरातील कोमोरोस या बेटाशी संपर्क साधला आहे. कदाचित चीनने त्यांनाही मोठ्या गुंतवणुकीची ऑफर दिली असेल. कोमोरोस मोझांबिक वाहिनीजवळ आहे. त्याचे भौगोलिक स्थान सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जगातील सुमारे 30 टक्के टँकर या ठिकाणाहून जातात.

कोमोरोस सरकारने 2018 मध्ये चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पात सामील होण्यासाठी करारावर स्वाक्षरी केल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. वृत्तानुसार, कोमोरोसने आता चिनी लष्करी तळाला जागा देण्याचे मान्य केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com