China Crime News: चीनमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जिवंत जाळले. त्यावेळी ती एका ऑनलाइन पोर्टलवर लाईव्ह स्ट्रिम करत होती. न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, तांग लू नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना सप्टेंबर 2020 मधील आहे, जेव्हा त्याची पत्नी टिकटॉक सारख्या अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. मृत महिलेचे नाव लामू आहे.
दरम्यान, ही घटना चीनमध्ये (China) चर्चेचा विषय ठरली होती. तांगने यापूर्वीही पत्नी लामूचा छळ केला होता. चीनी मीडियानुसार, जून 2020 मध्ये लामूने घरगुती हिंसाचाराला कंटाळून घटस्फोट घेतला. यानंतरही तांग अनेकदा लामूला त्रास देत होता. तो तिच्यावर पुन्हा लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. परंतु लामू पुन्हा लग्न करायला तयार नव्हती.
दुसरीकडे, घटनेच्या दिवशी लामू लाइव्ह स्ट्रीम करत असताना मागून तांग आला. त्याने लामूवर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यानंतर तांगला अटक करण्यात आली. लाईव्ह स्ट्रिमिंगमुळे हा व्हिडिओही मोठ्या संख्येने लोकांनी पाहिला. लामू तिबेटीयन होती. ती तिच्या व्हिडिओमध्ये देखील तिबेटी कपड्यांमध्ये दिसत होती.
शिवाय, लामूच्या बहिणीने सांगितले की, 'लामूला तिच्या पतीकडून (Husband) खूप त्रास दिला जात होता, त्यामुळे तिचा घटस्फोट (Divorce) झाला.' चीनच्या कायद्यातील 2001 च्या दुरुस्तीनुसार, 'छळ' हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही. परंतु 2015 मध्ये पहिल्यांदा 'कौटुंबिक हिंसाचार' हा गुन्हा घोषित करण्यात आला. मात्र, तरीही कायदा कमकुवत असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.