इंडोनेशिया हादरलं! जकार्तामधील सात मजली इमारतीला भीषण आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VEDIO

Jakarta Fire Tragedy Video: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आगीची एक मोठी आणि दुर्दैवी घटना समोर आली.
Jakarta Fire Tragedy Video
Jakarta Fire Tragedy VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Jakarta Fire Tragedy Video: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आगीची एक मोठी आणि दुर्दैवी घटना समोर आली. जकार्तामधील एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली, ज्यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जकार्तामधील एका सात मजली कार्यालयीन इमारतीत ही भीषण आग (Fire) लागली. या आगीत 20 लोक मृत्युमुखी पडले असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या टीमने इमारतीत अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरु केले. पोलीस प्रमुख सुसात्यो पुनोर्मो कोंड्रो यांनी सांगितले की, ही आग दुपारच्या सुमारास पहिल्या मजल्यावर लागली आणि त्यानंतर ती वेगाने संपूर्ण इमारतीत पसरली.

Jakarta Fire Tragedy Video
Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

ज्या इमारतीला आग लागली त्यामध्ये टेरा ड्रोन इंडोनेशिया (Indonesia) या कंपनीचे कार्यालय होते. ही कंपनी खाणकाम आणि शेती यांसारख्या क्षेत्रांसाठी हवाई सर्वेक्षण ड्रोन सेवा पुरवते. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी जपानच्या टेरा ड्रोन कॉर्पोरेशनची इंडोनेशियातील शाखा आहे. आग लागली तेव्हा टेरा ड्रोन इंडोनेशियाचे अनेक कर्मचारी इमारतीत होते. सुदैवाने, बरेच लोक जेवणासाठी बाहेर गेले होते. जे लोक बाहेर पडू शकले नाहीत, ते या आगीत अडकले.

आग लागण्याचे कारण

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या बॅटरीजमुळे लागली आणि त्यानंतर आगीने विक्राळ रुप धारण केले. आग लागण्याचे निश्चित कारण शोधण्यासाठी आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रत्येक मजल्यावर तपासणी केली जात आहे. दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांचा शोध सुरु आहे.

Jakarta Fire Tragedy Video
PM Modi In China: पंतप्रधान मोदींची ग्लोबल फॅन फॉलोईंग! चीनी सोशल मीडियावर ‘नंबर-1’ वर ट्रेंड; जिनपिंग-पुतिनसोबतची भेट ठरली खास

बचाव आणि नियंत्रण

पोलीस प्रमुख कोंड्रो यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणली गेली, पण आता बचाव पथके पीडितांना बाहेर काढण्यात आणि इमारत थंड करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान बॉडी बॅग्स घेऊन जाताना दिसले. तसेच, इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोर्टेबल शिड्यांचा वापर करण्यात आला. या घटनेनंतर टेरा ड्रोन इंडोनेशिया कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा निवेदन अद्याप जारी करण्यात आलेले नाही.

Jakarta Fire Tragedy Video
China’s Mega Dam: चीनचा 'वॉटरबॉम्ब' भारतासाठी धोकादायक? ब्रह्मपुत्रेवर जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे काम सुरू; 167 अब्ज डॉलर खर्च

जकार्तामध्ये झालेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इमारतीमध्ये अडकलेल्या इतर लोकांची माहिती घेण्यासाठी आणि मृतांची संख्या वाढू नये यासाठी बचाव कार्य वेगाने सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com