China Beijing Metro Accident: बीजिंगमध्ये 2 मेट्रोंची जोरदार टक्कर, सुमारे 500 लोक जखमी!

China Beijing Metro Accident: चीनची राजधानी बीजिंगमध्ये दोन मेट्रोंमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात सुमारे 500 जण जखमी झाले आहेत.
China Beijing Metro Accident
China Beijing Metro AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

China Beijing Metro Accident: चीनची राजधानी बीजिंगमध्ये दोन मेट्रोंमध्ये जोरदार टक्कर झाली. या अपघातात सुमारे 500 जण जखमी झाले आहेत. यात कोणताही मृत्यू झाला नसला तरी 100 हून अधिक लोकांना विविध ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. ताज्या रिपोर्टनुसार, सुमारे 450 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 20 हून अधिक लोक डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. बीजिंग प्रशासनाने अपघाताच्या कारणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. काल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 च्या सुमारास चांगपिंग लाईनवर हा अपघात झाला. ब्रेक नीट न लागल्याने बॅलन्स बिघडला आणि समोरुन येणाऱ्या मेट्रोला मेट्रोची धडक बसली.

स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेट्रो ट्रेन शिर्की स्टेशनवरुन लाईफ सायन्स पार्क स्टेशनच्या दिशेने जात होती. यादरम्यान अचानक बॅलन्स बिघडल्याने दोन मेट्रोंमध्ये जोरदार टक्कर झाली. या धडकेमुळे मेट्रोचे शेवटचे दोन डबे वेगळे झाले. स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. चांगपिंग लाईन आणि लाईन 13 मध्ये इंटरचेंज आहे, जी अपघातानंतर बंद करण्यात आली.

China Beijing Metro Accident
Taliban-China: तालिबान सरकारला मान्यता देणार चीन ठरला जगातील पहिला देश

दुसरीकडे, चांगपिंग मार्गाची दुरुस्ती केली जात आहे, मात्र या मार्गावरुन गाड्यांची वाहतूक कधी सुरु होईल, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. अचानक टक्कर झाली आणि मेट्रोमधील दिवे बंद झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, ट्रेनमध्ये बिघाड झाल्याचे जाहीर करण्यात आले. प्रवाशांना ट्रेन सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि शटल बस स्थानकावर दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून तपास केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com