New York मध्ये पुन्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, अमेरिकेत गांधी पुतळ्यांवर अनेक हल्ले

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे.
Mahatma Gandhi
Mahatma Gandhi Dainik Gomantak

Mahatma Gandhi: अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. येथील एका मंदिरासमोर बसवण्यात आलेली ही बापूंची मूर्ती तर फोडण्यात आली आहेच, पण त्यावर बदमाशांनी आक्षेपार्ह शब्दही लिहिले आहेत. अलीकडे अमेरिकेत गांधी पुतळ्यांवर अनेक हल्ले झाले आहेत.

चार दिवस आधी म्हणजे 16 ऑगस्टला देखील असच काही गढलं होतं. जिथे पहाटे गांधी पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. हा पुतळा श्री तुळशी मंदिरासमोर ठेवला आहे. पोलिसांचा हवाला देत स्थानिक प्रसारमाध्यमांनी 6 जणांनी या पुतळ्याचे नुकसान केल्याचे वृत्त दिले आहे. एवढेच नाही तर मूर्तीवर स्प्रे पेंटने अशोभनीय कमेंटही लिहिण्यात आल्या आहेत.

Mahatma Gandhi
China: चिनी-कॅनडियन अब्जाधीशाला Court ने सुनावली 13 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या

3 ऑगस्टलाही महात्मा गांधींच्या पुतळ्याची हानी झाल्याची घटना घडल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ जारी केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या या फुटेजमध्ये मूर्तीवर हल्ला करणारे 25 ते 30 वर्षे वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे. पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज बेंझमध्ये संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. यासोबत आणखी एक गडद रंगाची कार होती, जी टोयोटा कॅमरी कार असल्याचा संशय आहे.

Mahatma Gandhi
Somalia: मोगादिशूमधील हयात हॉटेलवर अल-शबाबचा हल्ला, दोन सुरक्षा अधिकारी जखमी

दरम्यान, न्यूयॉर्क राज्य विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महात्मा गांधींचा हा पुतळा हाताने बनवला आहे. गेल्या वेळी या मूर्तीची केवळ दुरवस्था झाली होती, मात्र यावेळी मूर्तीची पूर्ण मोडतोड करण्यात आली आहे. याच वर्षी 14 जुलै रोजी कॅनडामध्ये गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. त्याचवेळी, या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com