China: चिनी-कॅनडियन अब्जाधीशाला Court ने सुनावली 13 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या

Chinese-Canadian Billionaire: चिनी वंशाच्या कॅनेडियन अब्जाधीशाला एका आर्थिक गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Court
Court Dainik Gomantak

Chinese-Canadian Billionaire: चिनी वंशाच्या कॅनेडियन अब्जाधीशाला एका आर्थिक गुन्ह्याप्रकरणी न्यायालयाने 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, न्यायलायने त्याच्या कंपनीला 8.1 अब्ज डॉलरचा दंडही ठोठावला आहे. शांघाय नंबर 1 इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने म्हटले की, 'जिओ जियानहुआ हा बँक ठेवींमध्ये अब्जावधी डॉलर्सचा गैरवापर केल्याबद्दल दोषी आढळला आहे.'

दरम्यान, न्यायालयाने (Court) सांगितले की, 'शिओला 6.5 दशलक्ष युआन ($9.5 दशलक्ष) आणि त्याची कंपनी टुमॉरो ग्रुपला 55 अब्ज युआनचा ($8.1 अब्ज) दंड ठोठावण्यात आला आहे. शिओ 2017 मध्ये हाँगकाँगमधून (Hong Kong) बेपत्ता झाला होता. जानेवारी 2017 मध्ये त्याला हाँगकाँगच्या एका हॉटेलमध्ये शेवटचे पाहिले गेले होते. चिनी अधिकाऱ्यांनी त्याला चीनमध्ये (China) नेल्याचे समजते.

Court
China-Taiwan Conflict: तैवानच्या दिशेने ड्रॅगनची नवी चाल, अमेरिकेलाही आव्हान

दुसरीकडे, कॅनडा सरकारने म्हटले की, 'त्याच्यावरील 5 जुलैच्या खटल्याच्या कामकाजात राजनयिकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली होती. त्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, 'जिओला चिनी नागरिक मानले जाते, याचा अर्थ दोन सरकारांमधील राजनैतिक करारांतर्गत कॅनडाच्या राजनयिक अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com