LOC वर भारत-पाक संघर्ष थांबल्याचा भारतीय लष्करप्रमुखांचा दावा खोटा: पाक सेना

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांचे विधान.
Army Chief M M  Naravane
Army Chief M M NaravaneDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी शुक्रवारी म्हटले आहे की, भारताबरोबर झालेल्या 2021 च्या युद्धबंदी कराराकडे एकाची ताकद किंवा दुसऱ्याचा कमकुवतपणा म्हणून पाहिले जाऊ नये. सोबतच भारताने अत्यंत मजबूत भूमिकेने वाटाघाटी केल्यामुळे युद्धविराम सुरू असल्याचा भारतीय लष्करप्रमुखांचा दावा "दिशाभूल करणारा" असल्याचेही म्हटले आहे. 25 फेब्रुवारी महिन्यात 2003 च्या युद्धबंदी कराराला बांधील असताना नियंत्रण रेषेवर (LOC) गोळीबार थांबवणार असल्याचे जाहीर केले होते.

Army Chief M M  Naravane
अरे देवा! फक्त नाक झाकण्यासाठी बनवला विचित्र मास्क!

भारतीय लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी नवी दिल्लीतील एका चर्चासत्रात विधान केल्या नंतर एका दिवसातच पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी हे वक्तव्य केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, "आम्ही (India) मजबूत भूमिकेशी वाटाघाटी केल्या आहेत" म्हणून हे सुरूच आहे.

इफ्तिखारने ट्विट केले आहे की, "भारतीय लष्करप्रमुखांचा दावा आहे की, नियंत्रण रेषेवरील युद्धबंदी कायम आहे कारण त्यांनी अत्यंत मजबूत भूमिका घेऊन वाटाघाटी केल्या आणि नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या काश्मिरींच्या सुरक्षेबाबत पाकिस्तानच्या चिंतेमुळेच युद्धबंदीवर सहमती झाली. त्यामूळे दोन्ही बाजूंनी ती स्वतःची शक्ती आणि दुस-याची दुर्बलता म्हणून पाहू नये."

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या आश्वासनानुसार स्वयंनिर्णयाचा अधिकार प्राप्त करण्याच्या प्रयत्नांना देशाच्या जनतेला पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन देणारा ठराव पाकिस्तानच्या सिनेटने शुक्रवारी एकमताने मंजूर केला. संसदीय कार्य राज्यमंत्री अली मुहम्मद खान यांनी मांडलेल्या या ठरावात आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरमधील कथित मानवी हक्कांच्या उल्लंघनाची दखल घेऊन त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे की, "जम्मू-काश्मीर हा नेहमीच देशाचा (भारताचा) अविभाज्य भाग राहिला आहे, आहे आणि राहील." तर भारताने पाकिस्तानला वास्तव स्वीकारून भारतविरोधी प्रचार थांबवावा असाही सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com