Indian Origin Head: पोर्तुगालच्या पंतप्रधानाचा गोव्यात जन्म झाला, यासह अनेक देशांचे प्रमुख आहेत भारतीय

पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कॉश्ता यांचा जन्म गोव्यात झाला, त्यांना प्रेमाने बाबूश म्हणतात.
Indian Origin Head
Indian Origin HeadDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rushi Sunak) यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. सुरवातीला त्यांना लिझ ट्रस (Liz Truss) यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. मात्र, लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. सुनक 185 खासदारांच्या समर्थनासह ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. सुनक यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डोंट यांनी या शर्यतीतून माघार घेतली. पहिल्यांदाच भारतीय वंशाचे कुणीतरी ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे.

पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कॉश्ता

पोर्तुगालचे पंतप्रधान आंतोनियो कॉश्ता (António Costa) भारतीय वंशाचे पहिले युरोपियन पंतप्रधान (Prime Minister of Portugal) आहेत. आंतोनियो कॉश्ता यांच्या समाजवादी पक्षाला 36.65 टक्के मते मिळाली. आंतोनियो कॉश्ता पोर्तुगालचे 119 वे पंतप्रधान असून, 26 नोव्हेंबर 2015 पासून ते पदावर आहेत. कोस्टा अर्धे पोर्तुगीज आणि अर्धे भारतीय आहेत. कॉश्ता यांचा जन्म गोव्यात झाला असून, गोव्यात त्यांना 'प्रेमाने' बाबूश म्हणून ओळखले जाते.

गयानाचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद इरफान अली

मोहम्मद इरफान अली (Mohamed Irfaan Ali) यांनी गयानाचे नववे कार्यकारी अध्यक्ष (President of Guyana) आहेत. 2 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली. अली यांचा जन्म लिओनोरा, वेस्ट कोस्ट डेमारारा येथे एका मुस्लिम इंडो-ग्युयानी कुटुंबात झाला.

Indian Origin Head
UK PM: भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटनचे नवे पंतप्रधान

सूरीनामीचे राष्ट्रपती चान संतोखी

चान संतोखी (Chan Santokhi) हे सूरीनामीचे नववे राष्ट्रपती (President of Suriname) आहेत. 2020 च्या निवडणुका जिंकल्यानंतर संतोखी हे सुरीनामचे एकमेव राष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. 13 जुलै रोजी संतोखी यांची राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड झाली. संतोखी यांचा जन्म 1959 मध्ये सूरीनामी येथील लेलीडॉर्प येथे एका इंडो-सूरीनामी हिंदू कुटुंबात झाला.

मॉरिशियसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रूपन

पृथ्वीराजसिंग रूपन (Prithvirajsing Roopun), यांना प्रदीप सिंग रूपन म्हणूनही ओळखले जाते. रूपन मॉरिशियसचे सातवे राष्ट्रपती (President of Mauritius) आहेत. रूपनचा जन्म एका भारतीय आर्य हिंदू कुटुंबात झाला.

Indian Origin Head
Rushi Sunak: ऋषी सुनक यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

मॉरिशियसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ

प्रविंद कुमार जगन्नाथ (Pravind Jugnauth) हे मॉरिशियसचे पंतप्रधान (Prime Minister of Mauritius) आहेत. एप्रिल 2003 पासून मिलिटंट सोशालिस्ट मूव्हमेंटचे नेते असणारे जगन्नाथ जानेवारी 2017 पासून मॉरिशियसचे पंतप्रधान आहेत. प्रविंद जुगनाथ यांचे पूर्वज भारतातील उत्तर प्रदेशचे आहेत. जगन्नाथ यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला आहे.

सिंगापूरच्या राष्ट्रपती हालिमा याकूब

सिंगापूरच्या राष्ट्रपती हालिमा याकूब (Halimah Yacob) या देखील मूळ भारतीय वंशाच्या असून, 2017 पासून त्या सिंगापूरच्या राष्ट्रपती (President of Singapore) म्हणून कार्यरत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com