UK PM: भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनले ब्रिटनचे नवे पंतप्रधान

पेनी मॉर्डंट यांची माघार, केवळ 25 खासदारांचा पाठिंबा
Rishi Sunak
Rishi Sunak Dainik Gomantak
Published on
Updated on

Rishi Sunak become UK’s PM: भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून, त्यांनी प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डोंट यांचा पराभव केला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे.

(Rishi Sunak set to become UK’s first Indian-origin PM)

ऋषी सुनक यांना जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, ट्रस यांना 45 दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले आणि विजयी झाले आहेत. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते. सुनक हे मागील सात महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान असतील.

Rishi Sunak
Britain News: ऋषी सुनक आज ब्रिटनचे पंतप्रधान बनू शकतात - वाचा 10 महत्वाचे मुद्ये

दरम्यान, ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे देखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. मात्र सोमवारी त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने ऋषी सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता वाढली. ब्रिटनची अर्थव्यवस्था मागील काही दिवसांपासून गटांगळ्या खात आहे. वाढत्या महागाईमुळे येथे अस्थिरता निर्माण झालेली आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com