Women
WomenDainik Gomantak

Fingers Length: लैंगिकता अन् बोटांच्या लांबीचं काय गणित? संशोधनात धक्कादायक खुलासा

Human Research: अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल बिहेविअरच्या अहवालात महिलांच्या बोटांशी संबंधित एक धक्कादायक खुलासा झाला आहे.
Published on

Study Report: अर्काइव्हज ऑफ सेक्शुअल बिहेविअरच्या अहवालात महिलांच्या बोटांशी संबंधित एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या अहवालात म्हटले आहे की, महिलांची बोटे त्यांच्या लैंगिकतेबद्दल सूचित करतात. ज्या महिलांची रिंग फिंगर आणि तर्जनी यांच्या लांबीमध्ये फरक आहे, त्यांची समलैंगिक असण्याची शक्यता जास्त असते.

संशोधनात काय घडले?

यासाठी संशोधकांनी काही जुळ्या महिलांच्या (Women) बोटांच्या 18 जोड्या तपासल्या, ज्यामध्ये एक महिला लेस्बियन तर दुसरी नॉर्मल असल्याचे आढळून आले. संशोधनादरम्यान (Research) लेस्बियन ठरलेल्या महिलेच्या बोटाच्या लांबीमध्ये मोठा फरक आढळून आला.

Women
NASA Images: खगोलीय वस्तूंच्या मनमोहक प्रतिमा नासाकडून शेअर, एकदा पहाच

पुरुषांवरही सर्वेक्षण केले

बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एसेक्स विद्यापीठातील संशोधकांच्या मते, महिलांच्या शरीरातील अशा बदलांसाठी गर्भाशयातील 'टेस्टोस्टेरॉन' हे सर्वात जास्त जबाबदार आहे. हे संशोधन पुरुषांवर देखील केले गेले होते, परंतु त्यांच्यामध्ये बोटांशी संबंधित अशी कोणतीही तथ्ये समोर आली नाहीत.

Women
Xi Jinping दोन वर्षांनंतर परदेश दौऱ्यावर, Vladimir Putin यांना भेटणार

अहवालात दावा

लेखकांच्या मते, 100% जनुके सामायिक करणार्‍या समान जुळ्यांची लैंगिकता पूर्णपणे भिन्न असू शकते. संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखाद्या व्यक्तीची लैंगिकता गर्भाशयात निश्चित केली जाते आणि ती त्या पुरुष संप्रेरकाच्या प्रमाणात अवलंबून असते. ज्याच्या आधारे लोक उघडपणे आपल्या भावना व्यक्त करतात. दुसरीकडे, संप्रेरक पातळी आणि बोटांच्या लांबीमधील फरक यांच्यातील दुव्यामुळे, एखाद्या महिलेची लैंगिकता तिच्या हाताकडे पाहून काही प्रमाणात निश्चित केली जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com