पाकिस्तानवर बंदी घाला म्हणत जगभरातून भारताला पाठिंबा

एकीकडे अफगाणिस्तानच्या (Afghanistan) विकासात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल भारताचे (India) सर्वत्र कौतुक केले जात असतानाच तालिबानला (Taliban) मदत केल्याबद्दल पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली जात आहे.(SanctionPakistan)
Nations around world backs India to put complete ban on Pakistan
Nations around world backs India to put complete ban on PakistanDainik Gomantak

एकीकडे अफगाणिस्तानच्या (Afghanistan) विकासात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल भारताचे (India) सर्वत्र कौतुक केले जात असतानाच तालिबानला (Taliban) मदत केल्याबद्दल पाकिस्तानवर (Pakistan) जोरदार टीका केली जात आहे(Sanction Pakistan). तालिबानने हाहाकार माजवलेल्या अफगाणिस्तानमध्ये पडद्यामागील युद्ध लादल्याबद्दल पाकिस्तानवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.याचा निषेध करण्यासाठी #SanctionPakistan हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. भारताचे कौतुक करताना अमेरिकेने (America) पाकिस्तानला दहशतवाद्यांना मदत करणे बंद करा असे खडसावले आहे.(Nations around world backs India to put complete ban on Pakistan)

भारताने भूतकाळात अफगाणिस्तानमध्ये विधायक भूमिका बजावली असल्याचे अमेरिकेने मान्य केले. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी सोमवारी त्यांच्या दैनंदिन ब्रीफिंगमध्ये सांगितले, "भारताने पूर्वी प्रशिक्षण आणि इतर पायाभूत सुविधा सुधारण्याच्या बाबतीत अफगाणिस्तानमध्ये विधायक भूमिका बजावली आहे.

Nations around world backs India to put complete ban on Pakistan
अमेरिकेचा तालिबान्यांवर Airstrike, 11 जणांचा खात्मा

त्याचबरोबर अमेरिका अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील सुरक्षित आश्रयस्थान असलेले दहशतवाद्यांचे अड्डे याबद्दल पाकिस्तानी नेतृत्वाशी चर्चा करत आहे. अफगाणिस्तानातील असुरक्षितता आणि अस्थिरतेसाठी ही सुरक्षित आश्रय जबाबदार आहेत याची आम्हाला जाणीव आहे. पाकिस्तानी नेत्यांशी अशा चर्चा करण्यास आम्ही मागे हटणार नाही असेही जॉन किर्बी यांनी सांगितले आहे.

अमेरिकेपाठोपाठ कॅनडाचे राजकारणी ख्रिस अलेक्झांडर यांनीही अफगाणिस्तानातील हिंसाचाराला दोष देत पाकिस्तानवर बंदीची मागणी केली आहे. ख्रिस अलेक्झांडरने ट्विटरवर #sanctionpakistan सह ट्विट केले, अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा हल्ला हा सशस्त्र हल्ला आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरच्या सातव्या अध्यायात आक्रमकता आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था टिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने अनुच्छेद 41 किंवा 42 अंतर्गत कार्य करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

अफगाणिस्तानचे पहिले उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी देखील पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.,त्यांनी आपल्या शेजारील देशावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. "आम्ही संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना तालिबानच्या हिंसा आणि क्रूरतेच्या पीडितांना मदत करण्यासाठी आमच्यात सामील होण्याचे आवाहन करतो." तालिबानी क्रूरता आणि बलात्काराच्या बळींनी आश्रय घेतला आहे. काबूलच्या रस्त्यांचे दृश्य अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com