'लांग्या' विषाणूचा चीनमध्ये तडाखा; आत्तापर्यंत 35 रुग्णांची नोंद

कोरोना विषाणूचा पूर्णपणे नायनाट झालेला नसताना चीनमध्ये आणखी एका विषाणूचे रुग्ण सापडला आहे.
Langya Virus
Langya VirusDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना विषाणूचा (Corona Virus) पूर्णपणे नायनाट झालेला नसताना चीनमध्ये आणखी एका विषाणूचे रुग्ण सापडला आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतातील लोकांना या नवीन प्रकारच्या लांग्या व्हायरसची (Langya Virus) लागण झाल्याचे आढळून आले. आता तज्ज्ञ चीनमधून उद्भवलेला हा नवीन विषाणू किती धोकादायक आहे हे सांगण्यामध्ये व्यस्त आहेत. (Langya virus outbreak in China 35 cases reported so far)

Langya Virus
Covid-19: नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी

खरे तर चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या विषाणू आढळून आला. चीनी मीडिया तैपेई टाईम्सच्या मते, हा लांग्या व्हायरस प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये झुनोटिक लँग्या विषाणू आढळून आला त्यामुळे जवळपास 35 जणांना याची लागण झाली आहे. तैवान या विषाणूचा संसर्ग ओळखण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी न्यूक्लिक अॅसिड चाचणी पद्धत सुरू करणार आहे.

अभ्यासात असे म्हटले की, हा विषाणू व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकत नाही, असे आत्ताच सांगता येणार नाही. तैवान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे उपमहासंचालक म्हणतात की, पाळीव प्राण्यांवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत दोन टक्के प्रकरणे शेळ्यांमध्ये आणि पाच टक्के कुत्र्यांमध्ये आढळून आली आहेत.

25 वन्य प्राण्यांच्या प्रजातींवर केलेल्या चाचण्यांचे निकाल सूचित करतात की लांग्या विषाणूचा प्रसार होण्याचे मुख्य कारण काय असू शकते. चीनमध्ये एका नवीन विषाणूची ओळख पटली, ज्यामुळे मानवांमध्ये ताप येतो, असे 'चीनमधील लांग्या व्हायरस' या अहवालात गुरुवारी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आले.

Langya Virus
Rishi Sunak यांच्या विजयासाठी ब्रिटनमध्ये होम हवन, जाणून घ्या

विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये लक्षणे

सध्या 8 ऑगस्ट रोजी चीनमध्ये झुनोटिक लांग्या व्हायरसच्या 35 प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे. ग्लोबल टाईम्सच्या मते, चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लोकांना संक्रमित करणारा हेनिपाव्हायरस लांग्या हा नवीन प्रकार आढळून आला आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा लोकांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायूंमध्ये अस्वस्थता, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे दिसून येतात.

शेंडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये, लांग्या हेनिपाव्हायरस संसर्गाच्या 35 पैकी 26 प्रकरणांमध्ये ताप, चिडचिड, खोकला, मळमळ, डोकेदुखी आणि उलट्या यांसारखी लक्षणे आढळून आली आहेत. पूर्व चीनमधील ताप असलेल्या रुग्णांच्या घशातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये ही लक्षणे आढळून आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com