Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Foreign Ministry Advisory: शनिवारी किर्गिस्तानमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. किर्गिस्तानमध्ये सुमारे 14,500 भारतीय विद्यार्थी राहतात.
foreign ministry advisory
foreign ministry advisory dainik gomantak

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. यावर चिंता व्यक्त करत भारत सरकारने भारतीय विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच शनिवारी किर्गिस्तानमधील भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला. किर्गिस्तानमध्ये सुमारे 14,500 भारतीय विद्यार्थी राहतात.

परिस्थिती नियंत्रणात आहे

या घटनेबाबत किर्गिझ परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तपास यंत्रणेने या घटनेत सहभागी व्यक्ती, परदेशी नागरिक आणि किर्गिझ नागरिकांना ताब्यात घेण्यासाठी तात्काळ पावले उचलली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. हिंसाचारात एकही परदेशी नागरिक जखमी झाल्याचे वृत्त नाही.

foreign ministry advisory
Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

परराष्ट्र मंत्री म्हणाले- आम्ही विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत

किर्गिस्तानमधील भारतीय दूतावासाने ट्विट करत सांगितले की, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. परिस्थिती शांत आहे. परंतु खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना काही काळ घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाशी संपर्क साधा. आमचा 24-7 संपर्क क्रमांक 0555710041 आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दूतावासाची पोस्ट शेअर केली. बिश्केकमधील भारतीय विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

foreign ministry advisory
Kyrgyzstan Tajikistan Violence: दोन देशात पाण्यावरून वाद; 31 ठार शेकडो जखमी

पाकिस्ताननेही चिंता व्यक्त केली

याशिवाय, भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही आपल्या विद्यार्थ्यांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानी मिशननुसार, बिश्केकमधील वैद्यकीय विद्यापीठांच्या काही वसतिगृहांवर हल्ला करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विद्यार्थी राहतात. पाकिस्तानी दूतावासाने आपल्या अॅडवायजरीमध्ये म्हटले आहे की, 13 मे रोजी किर्गिझ आणि इजिप्शियन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमुळे हिंसाचार आणखी भडकला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बिश्केकमधील परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी बिश्केकमध्ये तैनात असलेल्या राजदूतांना विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com