ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II Death) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर किंग चार्ल्स तृतीय यांनी शनिवारी 'एक्सेसेशन कौन्सिल'च्या ऐतिहासिक राज्याभिषेक समारंभात ब्रिटनचा नवे सम्राट म्हणून घोषित करण्यात आले. जुनी परंपरा मोडीत काढत प्रथमच दूरदर्शनवर राज्याभिषेक सोहळा प्रसारित करण्यात आला.
चार्ल्स तृतीय यांची पत्नी कॅमिल पार्कर हिला क्वीन कॉन्सोर्ट ही उपाधी देण्यात आली. यावेळी लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम, पंतप्रधान लिझ ट्रस आणि इतर उपस्थित होते. जुनी परंपरा मोडीत काढत प्रवेश परिषदेचे पहिल्यांदाच टीव्हीवर प्रसारण करण्यात आले.
राज्याभिषेक समारंभास किंग चार्ल्स तृतीय यांची पत्नी, क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला आणि त्यांचा मुलगा आणि वारस प्रिन्स विल्यम उपस्थित होते. प्रिन्स विल्यम हे वेल्सचे नवीन प्रिन्स आहेत.
प्रोटोकॉलनुसार चार्ल्स यांच्या आईच्या मृत्यूनंतर राजा झाले आहेत. नवीन सम्राटाचा राज्याभिषेक आधीच्या राजाचा मृत्यू झाल्यानंतर 24 तासांच्या आत होतो, पण यावेळी त्याला जास्त वेळ लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.