North Korea: उत्तर कोरियात उपासमार आणि गरिबीमुळे लोक करतायेत आत्महत्या, किम जोंग संतापला; अधिकाऱ्यांना म्हणाला...

Kim Jong Un: उत्तर कोरियामध्ये लोक उपासमार आणि गरिबीमुळे मरु लागले आहेत. दोन वेळचे जेवण मिळत नसल्याने ते आत्महत्या करत आहेत.
Kim Jong Un
Kim Jong UnDainik Gomantak

North Korea: उत्तर कोरियामध्ये लोक उपासमार आणि गरिबीमुळे मरु लागले आहेत. दोन वेळचे जेवण मिळत नसल्याने ते आत्महत्या करत आहेत. आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

त्यामुळे हुकूमशहा किम जोंग चांगलाच संतापला आहे. त्याने अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. या घटनांवर रोख लावण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, रेडिओ फ्री एशियाशी बोलताना खुद्द किमच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, किम जोंग उनने स्थानिक अधिकाऱ्यांना आत्महत्यांवर रोख लावण्याचे आदेश दिले आहेत, कारण दिवसेंदिवस आत्महत्यांमध्ये वाढच होत चालली आहे.

मात्र, या आत्महत्यासंबंधी अचूक आकडेवारी समोर आलेली नाही. प्योंगयांगचा डेटा गुप्त आहे. मे महिन्यात उत्तर कोरियाच्या (North Korea) गुप्तचरांनी अंदाज वर्तवला आहे की, मागील वर्षाच्या तुलनेत देशातील आत्महत्या सुमारे 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Kim Jong Un
North Korea: बायबलसह पकडलेल्या ख्रिश्चनांवर उत्तर कोरियात जुलुम, 2 वर्षाच्या चिमुकल्यासह...

दुसरीकडे, आपल्या आदेशात किम जोंग उनने (Kim Jong Un) आत्महत्येला 'देशद्रोह' म्हटले आहे. तो म्हणाला की, मी स्थानिक सरकारी अधिकार्‍यांना थेट इशारा दिला आहे की, जर त्यांनी त्यांच्या भागात आत्महत्या थांबवल्या नाही तर त्यांना जबाबदार धरले जाईल.

आपत्कालीन बैठकांमध्येही किमच्या आदेशाचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, आत्महत्या प्रकरणांची आकडेवारी देण्यात आली. त्याचबरोबर, लोक आत्महत्या का करत आहेत, याचीही कारणे देण्यात आली आहेत.

Kim Jong Un
North Korea पुन्हा चवताळला, पाणबुडीवरुन डागली 2 क्रूझ क्षेपणास्त्रे; अमेरिका-दक्षिण कोरिया...

सरकार आत्महत्यांवर नियंत्रण ठेवू शकले नाही

किमच्या अधिकाऱ्याने असा दावा केला की, बैठकीत उपस्थित असलेले लोक आत्महत्येची आकडेवारी जाणून हैराण झाले होते. रायनगँगच्या आणखी एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, उपासमारीपेक्षा आत्महत्येचा परिणाम लोकांवर होत आहे.

आत्महत्या प्रतिबंधक धोरण असूनही ते रोखण्यात अधिकारी अपयशी ठरत आहेत. अत्यंत गरिबी आणि उपासमारीला कंटाळून आत्महत्यांच्या बहुतांश घटना समोर आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 2019 च्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियामध्ये प्रति 100,000 लोकांमागे 8.2 आत्महत्या झाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com