Swaminarayan Temple Sydney: सिडनीत स्वामीनारायण मंदिराची तोडफोड, खलिस्तानी ध्वज फडकवला!

Swaminarayan Temple: ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिरात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.
Sydney Swaminarayan Temple
Sydney Swaminarayan TempleDainik Gomantak
Published on
Updated on

Swaminarayan Temple in Sydney: ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा खलिस्तानी समर्थकांनी हिंदू मंदिरात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.

यावेळी सिडनीतील स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली. खलिस्तानी समर्थकांनी मंदिरावर खलिस्तानचा झेंडाही फडकावला.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वेस्टर्न सिडनीच्या रोझहिल उपनगरातील BAPS स्वामीनारायण मंदिरात शुक्रवारी पहाटे मंदिर व्यवस्थापनाला असे आढळून आले की, मंदिराची समोरची भिंत पडलेली असून त्यावर खलिस्तानचा ध्वज लटकलेला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात गेल्या काही काळात खलिस्तान समर्थकांकडून हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

ऑस्ट्रेलियातील (Australia) ब्रिस्बेन येथील एका प्रमुख हिंदू मंदिराची खलिस्तान समर्थकांनी 4 मार्च रोजी तोडफोड केली होती. ही घटना ब्रिस्बेन येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात घडली.

यापूर्वी, 23 जानेवारीला मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमधील इस्कॉन मंदिराच्या भिंतींवर 'हिंदुस्तान मुर्दाबाद' असे लिहिले होते.

Sydney Swaminarayan Temple
SCO Summit Goa 2023: हस्तांदोलन अन् डिनर; बिलावल आणि जयशंकर यांची भेट, द्विपक्षीय बैठकीची शक्यता कमी

जानेवारीत दोन मंदिरांची तोडफोड झाली

16 जानेवारी रोजी व्हिक्टोरियातील कॅरम डाऊन येथील ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिराची अशाच प्रकारे तोडफोड करण्यात आली होती.

12 जानेवारी रोजी मेलबर्ननधील स्वामीनारायण मंदिराची (Temple) तोडफोड करुन 'असामाजिक तत्वांनी' भारतविरोधी घोषणा लिहिल्या होत्या.

पीएम मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर हा मुद्दा उपस्थित केला

मार्चमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी अलीकडेच ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.

पीएम मोदी म्हणाले की, 'खेदाची बाब आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर हल्ल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अशा बातम्यांनी भारतातील तमाम लोकांना चिंता वाटणे, मन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.'

Sydney Swaminarayan Temple
SCO Summit 2022: गलवान संघर्षानंतर PM मोदी अन् शी जिनपिंग आमनेसामने, पुतीन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक

पंतप्रधान पुढे म्हणाले होते की, 'मी देशवासीयांच्या या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बानीज यांच्यासमोर ठेवल्या. आणि त्यांनी मला आश्वासन दिले आहे की, भारतीय समुदायाच्या सुरक्षेला त्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे.

आमचे कार्यसंघ या विषयावर नियमित संपर्कात असतील आणि शक्य तितके सहकार्य करतील, असेही त्यांनी सांगितले आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com