काझी फैझ बनले पाकिस्तानचे 29 वे सरन्यायाधीश, भ्रष्टाचाराच्या आरोपांचा करावा लागला सामना

Justice Qazi Faiz: पाकिस्तानला अखेर नवे सरन्यायाधीश मिळाले आहेत. मात्र, त्यांना खूप कमी कालावधी मिळाला आहे.
Justice Qazi Faiz
Justice Qazi FaizDainik Gomantak

Justice Qazi Faiz: पाकिस्तानला अखेर नवे सरन्यायाधीश मिळाले आहेत. मात्र, त्यांना खूप कमी कालावधी मिळाला आहे. न्यायमूर्ती काझी फैज इसा रविवारी पाकिस्तानचे 29 वे सरन्यायाधीश झाले. यानंतर त्यांनी शपथ घेतली.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ 13 महिन्यांचा असेल, जो पुढील वर्षी 25 ऑक्टोबर रोजी संपेल. यापूर्वी, न्यायमूर्ती इसा यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचा खटला दाखल करण्यात आला होता, मात्र नंतर तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.

दरम्यान, न्यायमूर्ती इसा (63) यांना राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी इस्लामाबादमधील (Islamabad) ऐवान-ए-सदर येथे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात शपथ दिली.

न्यायमूर्ती इसा हे स्वतंत्र विचारसरणीचे मानले जातात आणि फैजाबादमधील एका धार्मिक संघटनेने केलेल्या आंदोलनाप्रकरणी शक्तिशाली संघटनेच्या विरोधात त्यांनी दिलेल्या निकालानंतर त्यांना 2019 मध्ये लक्ष्य करण्यात आले होते.

हा देश अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत असताना इसा यांना पाकिस्तानच्या सरन्यायाधीशपदाची कमान मिळाली आहे.

Justice Qazi Faiz
Pakistan: पीओकेमध्ये फडकणार 'तिरंगा'? बलुचिस्तान-बाल्टिस्तानचे लोक...

येत्या काही महिन्यांत पाकिस्तानात निवडणुका होणार

न्यायमूर्ती इसा यांच्या कार्यकाळात पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकाही होणार आहेत. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, त्यांना माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह इतरही अनेक मोठ्या खटल्यांची सुनावणी करावी लागू शकते. या काळात पाकिस्तान आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांशी झुंजत आहे.

माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी, त्यांनी तत्कालीन शाहबाज शरीफ सरकारच्या विरोधात आंदोलन आणि निदर्शने केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com