पाकिस्तानात नव्याने स्थापन झालेल्या शाहबाज शरीफ यांच्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या प्रशासनाने गुरुवारी म्हटले. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि पाकिस्तानातील (Pakistan) सत्तापरिवर्तनात अमेरिकेच्या भूमिकेबद्दल त्यांच्या समर्थकांचे आरोपही बायडेन प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळून लावले. अमेरिकेच्या (America) परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस (Ned Price) यांनी त्यांच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, 'पाकिस्तानी संसदेने देशाच्या पंतप्रधानपदी निवड केल्याबद्दल आम्ही शाहबाज शरीफ (Shahbaz Sharaf) यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर आम्ही त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.' (Joe Biden's administration says it is eager to work with the government of Shehbaz Sharif in Pakistan)
प्राइस म्हणाले की, ''अमेरिका आणि पाकिस्तानचे जवळपास 75 वर्षांपासून द्विपक्षीय संबंध आहेत. भारतीय उपखंडात शांतता आणि समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पाकिस्तान सरकारसोबत पुन्हा नव्याने संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक आहोत."
'इम्रान यांच्या आरोपात तथ्य नाही'
"आमचा संदेश अतिशय स्पष्ट आहे." प्राइस पुढे म्हणाले. ''जे काही आरोप झाले त्यात तथ्य नाही. आम्ही मानवी हक्कांचा आदर करतो. संवैधानिक आणि लोकशाही तत्त्वांचे शांततापूर्ण पालन करण्याचे समर्थन करतो. आम्ही पाकिस्तानमध्ये किंवा जगात कुठेही इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा अधिक समर्थन करत नाही. त्याचबरोबर आम्ही कायद्याचे राज्य आणि कायद्याच्या अंतर्गत समान न्यायाचे समर्थन करतो.''
पाकिस्तानकडे पुरावा नाही - अमेरिका
प्राइस म्हणाले की, 'बायडन प्रशासनाने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याची धमकी दिली होती किंवा त्यांच्या कटात ते सामील होते हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडे कोणतेही पुरावे नाहीत. खरं तर, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अविश्वास प्रस्तावाअंतर्गत सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.' आपल्या सरकारला सत्तेवरुन हटवण्यासाठी विरोधकांनी अमेरिकेच्या इशाऱ्यावर हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपाचा पुरावा असल्याचे देखील त्यांनी पत्रातही सांगितले होते. परंतु हे पत्रही आम्ही पाहू शकलो नाही. इम्रान खान यांचा यातून निव्वळ ढोंगीपणा दिसून येतो, असेही प्राइस शेवटी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.