Israel attacks residential building, kills 30 Palestinians; 266 people died in 24 hours: इस्रायलच्या हल्ल्यात 30 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पॅलेस्टिनी माध्यमांनी सोमवारी हा दावा केला आहे.
प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने गाझामधील एका निवासी इमारतीला लक्ष्य केले. ज्या इमारतीला लक्ष्य करण्यात आले ती इमारत गाझाच्या जबलिया शरणार्थी शिबिरातील अल-शुहादा भागात होती.
पॅलेस्टिनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि इमारतीत उपस्थित किमान 30 लोकांचा मृत्यू झाला.
गेल्या २४ तासांत इस्रायलच्या हवाई हल्ल्यात २६६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला असून त्यात ११७ मुलांचा समावेश आहे.
गेल्या दोन आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये ४६०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यामुळे 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे की, त्यांनी लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहच्या दोन तळांना लक्ष्य केले आहे, तेथून इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्याची तयारी केली जात होती. हिजबुल्लाहनेही आपला एक सैनिक मारला गेल्याची कबुली दिली आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाला इशारा दिला आहे की, जर हिजबुल्लाने युद्धात सहभागी होण्याचा प्रयत्न केला तर दुसरे लेबनॉन युद्ध होऊ शकते आणि ही चूक हिजबुल्लाची सर्वात मोठी चूक असेल.
इस्त्रायली क्षेपणास्त्रांनी दमास्कस आणि अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हल्ला केल्याचा दावा सीरियन प्रसार माध्यमांनी केला आहे. त्यामुळे विमानतळाचे कामकाज विस्कळीत झाले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायली लष्कराने देखील एक निवेदन जारी केले आहे की, रविवारी त्यांच्या रणगाड्यांनी चुकून दक्षिणेकडील इजिप्शियन स्थानावर हल्ला केला. या हल्ल्यात आपले काही सैनिक जखमी झाल्याचे इजिप्तने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.