Elon Musk New Startup: एलन मस्क यांनी केली नव्या कंपनीची घोषणा, ChatGPT ला नवा पर्याय?

प्रसिद्ध उद्योजक आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी नव्या कंपनीची घोषणा केली आहे.
Elon Musk xAI
Elon Musk xAIDainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk Launches New Startup

प्रसिद्ध उद्योजक आणि ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी नव्या कंपनीची घोषणा केली आहे. एक्स एआय (xAI) असे या कंपनीचे नाव असून, मस्क यांनी स्वत: ट्विटरवरती याबाबत माहिती दिली आहे. कंपनी एआय क्षेत्रात कंपनी काम करणार असून, मस्क यांनी त्याचे संकेतस्थळ लॉन्च केले आहे.

मस्क यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) स्टार्टअपमध्ये अल्फाबेटच्या मालकीच्या Google पासून मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI अशा कंपन्यांमध्ये काम केलेल्या अभियंत्यांची निवड करण्यात आली आहे.

मस्क यांनी नवी कंपनी नुकतेच बाजारात प्रसिद्ध होत असलेल्या ChatGPT पर्याय म्हणून समोर येईल अशी चर्चा आहे.

Elon Musk xAI
Goa Government: गोवा सरकार केंद्राला लिहिणार पत्र; ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कराच्या निर्णयावर पुनर्विचाराची मागणी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी xAI च्या माध्यमातून आपण विश्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करू. XAI टीमचे नेतृत्व एलन मस्क करतील आणि त्याच्या कर्मचार्‍यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये यापूर्वी काम केलेले अभियंते आणि तंत्रज्ञ असतील. असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

मस्क यांची नवी कंपनी चॅट जीपीटी या कंपनीला तगडा पर्याय निर्माण करेल असे या विषयातील तज्ञ म्हणत आहेत. बाजारात सध्या चॅट जीपीटी नंतर गुगल बार्ड आणि त्यानंतर आता मस्क यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एन्ट्री केल्याने येत्या काळात यात अनेक नवे बदल आणि नवे तंत्रज्ञान पाहायला मिळेल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com