नेपाळमध्ये 4 भारतीय आणि 22 प्रवाशांसह जोमसोमला जाणारे विमान बेपत्ता

या विमानाने पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. नंतर त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला.
Tara Air Flight
Tara Air FlightANI
Published on
Updated on

भारताचा शेजारी देश नेपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळमध्ये एक प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. विमानातील क्रू, चार भारतीय आणि तीन जपानी नागरिकांसह एकूण 22 प्रवासी विमानात आहेत. या विमानाने पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. नंतर त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क तुटला.

Tara Air Flight
कमला हॅरिस यांनी अमेरिकन नागरिकांना केले द्वेष-हिंसाचार संपविण्याचे आवाहन

रात्री 10.35 नंतर एटीएसशी संपर्क तुटला

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या अर्ध्या तासापासून विमानाचा एटीसीशी संपर्क झालेला नाही. विमान 10:35 पर्यंत एटीसीच्या संपर्कात होते. सध्या या विमानाची माहिती घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. जोमसोम एअरपोर्ट एटीसीने सांगितले की, विमानाचा शेवटचा संपर्क ज्या भागात झाला होता तेथे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल म्हणाले, "नेपाळी लष्कराचे एमआय-17 हेलिकॉप्टर नुकतेच लेते, मुस्तांग येथे रवाना झाले आहे, या प्रसंगामुळे या भागात विमान कोसळले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tara Air Flight
'ड्रॅगन'ला धडा शिकवण्यासाठी जपान 12 देशांना देणार लढाऊ विमाने

विमानात कोणत्या देशाचे किती नागरिक होते?

तारा एअरच्या माहितीनुसार, विमानात क्रूसह एकूण 22 प्रवासी आहेत. यापैकी 13 नेपाळी, 4 भारतीय आणि दोन जपानी नागरिक आहेत. क्रू मेंबर्समध्ये विमानाचा पायलट कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक इटासा पोखरेल आणि एअर होस्टेस कासमी थापा यांचा समावेश आहे. तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बारटौला यांनी विमान बेपत्ता झाल्याची पुष्टी केली असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com