EAM S.Jaishankar Slams Pakistan on Terror: गोव्यातील SCO बैठकीपुर्वी जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारले; काय म्हणाले घ्या जाणून...

गोव्यात 5 मे रोजी पाकचे पराराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोशीं होणार भेट
BIlawal Bhutto | S. Jaishankar
BIlawal Bhutto | S. JaishankarDainik Gomantak
Published on
Updated on

EAM S.Jaishankar Slams Pakistan on Terror: आगामी आठवड्यात गोव्यात SCO ची बैठक होत आहे. या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो येणार आहेत. तत्पुर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारले आहे.

त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद संपवण्याचा सल्ला दिला आहे. जयशंकर सध्या पनामा दौऱ्यावर आहेत. यावेळी पनामाच्या परराष्ट्र मंत्री जनैना टेवाने मेनकोमो यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

BIlawal Bhutto | S. Jaishankar
Jagannath Temple in London: लंडनमध्ये साकारतेय युरोपमधील पहिले जगन्नाथ मंदिर; 'या' उद्योगपतीने दिले 254 कोटी रूपये

दरम्यान, SCO बैठकीत भुट्टो आणि जयशंकर यांची भेट होणार आहे. तत्पुर्वी जयशंकर यांनी फटकारल्याने आता ही भेट कशी होतेय, या भेटीत काय चर्चा होईल, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

पनामातील पत्रकार परिषदेत जयशंकर म्हणाले की, "भारताच्या विरोधात सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या शेजाऱ्याशी संबंध ठेवणे आमच्यासाठी खूप कठीण आहे. आमची या मुद्द्यावरील भूमिका स्पष्ट आहे.

त्यांनी (पाकिस्तान) सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देऊ नये. ही वचनबद्धता आपल्याला पूर्ण करायची आहे. आशा आहे की एक दिवस आम्ही त्या टप्प्यावर पोहोचू."

यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये सायप्रस दौऱ्यावर असतानाही जयशंकर म्हणाले होते की, दहशतवाद सुरू ठेऊन भारताशी वाटाघाटी करता येणार नाहीत. आम्हाला सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध हवे आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दहशतवादाच्या मुद्द्यावर तडजोड करू."

BIlawal Bhutto | S. Jaishankar
Yuri Alemao: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली पहिल्या प्रेमाची कबुली; म्हणाले...

पनामा दौऱ्यादरम्यान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी एका हिंदू मंदिराला भेट दिली. येथील भारतीय समुदायातील लोकांशी संवाद साधला. दरम्यान, 60 वर्षांत प्रथमच भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पनामाला भेट दिली आहे.

गोव्यात 5 मे रोजी होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह, चीनचे परराष्ट्र मंत्री क्विन गँग हे देखील उपस्थित राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com