Margao News : पत्रकार परिषदेत योगीराज यांचे काय काम? काँग्रेसचा सवाल

Margao News : सरकारी कार्यक्रमात गैरवापराबद्दल माफी मागा
Viriato Fernandes
Viriato FernandesDainik Gomatnak
Published on
Updated on

Margao News : मडगाव, बालचित्रपट महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि फातोर्ड्याचे पराभूत भाजप उमेदवार दामोदर नाईक यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सवंग प्रसिद्धीसाठी योगीराज कामत आणि दामू नाईक यांना प्रसारमाध्यमांना संबोधित करण्यास दिल्याबद्दल रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केली आहे.

स्वयंघोषित गॉडमॅन आणि पक्षबदलू आमदार दिगंबर कामत यांनी आपला मुलगा योगीराज कामत यांना करदात्यांच्या पैशांच्या कार्यक्रमाचे सरकारी व्यासपीठ वापरून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.

भाजपचे सरचिटणीस दामू नाईक हे सरकारी खर्चाने आयोजित बालचित्रपट महोत्सवात कसे सहभागी होऊ शकतात? असा प्रश्न विचारत, विरियातो फर्नांडिस यांनी गोवा मनोरंजन संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच उपाध्यक्ष दिलायला लोबो हे दिगंबर व दामूंकडून होणारा सत्तेचा दुरुपयोग थांबवतील का? असा सवाल केला.

रवींद्र भवन, मडगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रपट महोत्सवासंदर्भात फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक आणि दिगंबर कामत यांचे पुत्र योगीराज कामत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी योगीराज आणि दामू नाईक यांना कोणत्या अधिकाराने प्रसार माध्यमांना संबोधित करण्याची परवानगी दिली हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com