Israeli War Cabinet Dissolves: वॉर कॅबिनेट बरखास्त! देशांतर्गत राजकारणात नेतन्याहूंचा पाय खोलात

Israeli PM Benjamin Netanyahu: जागतिक पातळीवर सतत दबावाचा सामना करणाऱ्या नेतान्याहूंना आता देशांतर्गत पातळीवरही दबावाचा सामना करावा लागत आहे.
Israel Benjamin Netanyahu
Israel Benjamin Netanyahu Dainik Gomantak

Benjamin Netanyahu Dissolves Israeli War Cabinet: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. इस्त्रायल सातत्याने गाझासह हमासशासित शहरांवर हल्ले करत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्त्रायलला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत.

जागतिक पातळीवर सतत दबावाचा सामना करणाऱ्या नेतान्याहूंना आता देशांतर्गत पातळीवरही दबावाचा सामना करावा लागत आहे. नेतन्याहू यांनी गाझामध्ये सुरु असलेल्या युद्धासाठी तयार करण्यात आलेले 6 सदस्यीय वॉर कॅबिनेट बरखास्त केले आहे. सध्या इस्रायलमध्ये (Israel) आघाडीचे सरकार सुरु आहे. त्या आघाडी सरकारचे नेतृत्व नेतन्याहू करत आहेत. आघाडी सरकारमधील एक सदस्य असलेले बेनी गँट्झ यांनी काही दिवसांपूर्वीच नेतन्याहू यांचा हात सोडला. यानंतर वॉर कॅबिनेट बरखास्त होण्याची शक्यता होती.

Israel Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahu: ‘’मारेकऱ्यांना गोल्ड मेडल देण्यात आलं’’, पॅलेस्टाईनला मान्यता दिल्याने नेतन्याहू संतापले; दिला कारवाईचा इशारा

दरम्यान, आघाडी सरकारमधील सहकारी राष्ट्रवादी आणि धार्मिक पक्षांकडून त्यांचा वॉर कॅबिनेटमध्ये समावेश करण्याची मागणी सातत्याने होत होती. इस्रायलचे अर्थमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्रीही या कॅबिनेटचा भाग होते.

Israel Benjamin Netanyahu
Benjamin Netanyahu: ''अमेरिकन विद्यापीठांमध्ये जे काही चाललयं ते हिटलरच्या राजवटीची आठवणं करुन देणारं''; नेतन्याहू पुन्हा संतापले

कोणत्याही युद्धादरम्यान इस्त्रायलमध्ये वॉर कॅबिनेट तयार केले जाते, जे त्या युद्धाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेते. वास्तविक, इस्रायलने दररोज काही तास युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत इस्रायलचे लष्करी हल्ले थांबतील, या मर्यादित युद्धविरामामुळे उत्तरेकडे मदत सामग्री पोहोचणे सोपे होणार आहे. यावर सरकारच्या निर्णयाबाबत अतिउजव्या गटांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. नेतन्याहू सरकारमध्येही या गटाचा समावेश आहे. अशा स्थितीत लष्कराने या गटाच्या प्रश्नांना उत्तर देत या विरामाचा अर्थ युद्धाचा शेवट असा होत नसल्याची ग्वाही दिली. हमासचा (Hamas) नाश होईपर्यंत आम्ही हल्ले करत राहू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com