Pakistan त 8 वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार, नरधमांनी काढले डोळे

Pakistan Crime: ताज्या घडामोडींनुसार, एका आठ वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Pakistan Crime: विनाशकारी पुराशी झुंज देणाऱ्या पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदूंवरील हिंसाचार अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. ताज्या घडामोडींनुसार, एका आठ वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. एवढेच नाही तर नराधमांनी मुलीचे दोन्ही डोळे काढले.

दरम्यान, ही घटना पाकिस्तानच्या (Pakistan) सिंध प्रांतातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. संशयितांनी तिचा संपूर्ण चेहरा ओरबाडल्याची माहिती आहे. ही घटना उघडकीस आली जेव्हा पाकिस्तानमधील एका हिंदू सामाजिक कार्यकर्त्याने एक व्हिडिओ क्लिप ट्विट केली, ज्यामध्ये पीडितेला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात घेऊन जात असताना दिसत आहे.

दुसरीकडे, व्हिडिओमध्ये पिडीता कुटुंबींयासोबत रुग्णालयात जाताना दिसत आहे. रक्तस्त्राव थांबत नसल्याने मुलीची प्रकृती खलावत असल्याचे कुटुंबीयांनी पत्रकारांना सांगितले. फर्स्ट पोस्टनुसार, तिच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत आहे. स्थानिक आपत्कालीन रुग्णालयातील (Hospital) डॉक्टरांनी तिला बीआयडीएस रुग्णालयात पाठवले, जिथे स्त्रीरोगतज्ज्ञ तिची प्रकृती तपासतील.

Crime News
Pakistan: माणुसकीला काळीमा ! ऑलिम्पिक चॅम्पियनचा मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार

नराधमांनी डोळे काढले

त्यांनी पुढे सांगितले, "बलात्कारकर्त्यांनी मुलीचा संपूर्ण चेहरा ओरबाडला आहे. तिचे डोळेही काढले आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. हे एकच प्रकरण नाही, अशा हजारो घटना रोज घडत आहेत. कारवाई केली जाते परंतु हे लोक कुठे जातात, सरकारने उत्तर द्यावे.''

Crime News
Pakistan Flood: पाकिस्तानात महाप्रलय, 4 अब्ज डॉलरचं, लष्कराकडून बचावकार्य

तसेच, एका हिंदू अधिकार कार्यकर्त्याने पोस्ट केलेल्या दुसर्‍या व्हिडिओ क्लिपमध्ये, पीडितेच्या आईने एका वृत्त माध्यमाला बोलताना सांगितले की, पीडिता एका स्थानिक दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. परंतु ती तिथून परत आलीच नाही. व्हिडिओमध्ये पिडीता स्थानिक भाषेत बोलताना दिसत आहे. बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनी उमरकोट पोलिसांनी (Police) तपास सुरु केला. वृत्तानुसार, आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com