Israel Attack: गाझावर इस्रायलचा क्रूर हल्ला; बॉम्बहल्ल्यात 70 जण ठार, मृतांमध्ये 7 निष्पाप चिमुकल्यांचाही समावेश Watch Video

Israel Military Action On Gaza: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांती योजनेला हमासने तत्वतः स्वीकारले असतानाही, इस्रायली सैन्याने गाझावर आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत.
Israel Military Action On Gaza
Israel Gaza AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Gaza Attack: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांती योजनेला हमासने तत्वतः स्वीकारले असतानाही, इस्रायली सैन्याने गाझावर आपले हल्ले सुरुच ठेवले आहेत. इस्रायली सैन्याच्या ताज्या बॉम्बहल्ल्यात गाझामध्ये सुमारे 70 जणांना जीव गमवावा लागला, ज्यात अवघ्या 2 महिन्यांपासून ते 8 वर्षांपर्यंतच्या 7 निष्पाप मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा इस्त्रायल आणि हमास यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला.

शांतता योजना स्वीकारुनही इस्रायलचे हल्ले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गाझासाठी 21 कलमी शांतता योजना तयार केली आहे. हमासने या योजनेतील बहुतेक अटी मान्य केल्या असल्या तरी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझातील आपले सैन्य अभियान थांबवण्यास नकार दिला आहे.

पंतप्रधान नेतन्याहू यांचे म्हणणे आहे की, हमासने ट्रम्प यांच्या शांतता योजनेतील सर्व अटी मान्य केल्याची ठोस पुष्टी होईपर्यंत लष्करी कारवाई सुरुच राहील. हमासने इस्रायली कैद्यांच्या बदल्यात सुमारे 2000 पॅलेस्टिनी कैद्यांची अदलाबदल करण्यास आणि गाझातून इस्रायली सैन्याच्या माघारीस सहमती दर्शवली. मात्र, शांतता योजनेची मुख्य मागणी असलेल्या हमासच्या निःशस्त्रीकरण (Disarmament) करण्याच्या अटीवर हमास सहमत आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Israel Military Action On Gaza
Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे मोठे नुकसान

अलजजीराच्या अहवालानुसार, इस्रायली सैन्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझावर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या हल्ल्यांमध्ये 10 लाखांहून अधिक लोकांना त्यांच्या घरादारातून विस्थापित होऊन दक्षिण गाझा भागात आश्रय घेण्यासाठी कूच करावे लागले आहे.

  • तुफ्फाह (Tuffah) भागात इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात 18 लोकांचा मृत्यू झाला.

  • दक्षिण गाझातील अल-मवासी (Al-Mawasi) नावाच्या विस्थापन शिबिरावरही इस्रायली सैन्याने बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात 2 मुलांचा मृत्यू झाला, तर 8 लोक जखमी झाले.

विशेषतः, दोन महिन्यांच्या बाळापासून ते आठ वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाल्याने या हल्ल्याच्या क्रौर्याबद्दल जगभरातून संताप व्यक्त होत आहे.

शांतता वाटाघाटीसाठी पथक इजिप्तला रवाना

एकीकडे बॉम्बहल्ले सुरु असतानाच, शांततेसाठी राजनैतिक स्तरावर हालचालींना वेग आला आहे. हमासने (Hamas) शांतता योजना स्वीकारल्यामुळे इस्रायलने या योजनेनुसार पुढील पाऊल उचलत एक शांतता शिष्टमंडळ इजिप्तला पाठवले आहे. इजिप्तमध्ये हे शिष्टमंडळ हमासच्या शांतता प्रतिनिधींशी भेट घेणार आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

Israel Military Action On Gaza
Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर या दोघांना बंधकांची सुटका आणि कैद्यांची अदलाबदल प्रक्रिया पुढे नेण्यासाठी इजिप्तला पाठवले आहे. इजिप्तचे परराष्ट्र मंत्रालय या शांतता वाटाघाटीत मध्यस्थीची भूमिका बजावणार आहे. सध्या सुरु असलेली हिंसा आणि शांतता चर्चा एकाच वेळी सुरु असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता इजिप्तमध्ये होणाऱ्या शांतता वाटाघाटींकडे लागले आहे. हमासच्या निःशस्त्रीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाल्यासच या प्रदेशात शांतता प्रस्थापित होऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com