Israel Hamas War: 'नेतान्याहू देखील दहशतवादी...,' हमासच्या मुद्यावरुन तुर्कीचा इस्रायलवर हल्लाबोल

Israel Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध सातत्याने धोकादायक वळण घेत आहे.
Recep Tayyip Erdoğan
Recep Tayyip ErdoğanDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War: इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध सातत्याने धोकादायक वळण घेत आहे. या युद्धात दोन्ही छावण्यांमधील 7800 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये गाझाला मोठा फटका बसला आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान तुर्कीने आता इस्रायलच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. शुक्रवारी मोठी रॅली आयोजित करुन तुर्कीने इस्रायलला स्पष्ट संदेश दिला. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी इस्रायलला ‘युद्ध गुन्हेगार’ म्हटले.

जर हमास ही दहशतवादी संघटना असेल तर बेंजामिन नेतन्याहू देखील 'दहशतवादी' असल्याचे एर्दोगन म्हणाले. आम्हीही तयारी करत आहोत, असे त्यांनी इस्त्रायलला स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, एर्दोगन यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला पाठिंबा देऊन आणि इस्रायलच्या विरोधात वक्तव्य करुन जगासमोर नवे संकट उभे केले आहे.

तुर्की अॅक्शनमोडमध्ये येताच इस्रायलने (Israel) आपल्या राजनयिक अधिकाऱ्याला मायदेशी बोलावले. इस्तंबूलमध्ये पॅलेस्टाईन समर्थक रॅलीमध्ये हजारो निदर्शकांना संबोधित करताना एर्दोगन यांनी बेंजामिन नेतन्याहू 'दहशतवादी' असल्याची टिप्पणी केली.

एर्दोगन म्हणाले की, 'हमास ही मुजाहिदीन संघटना आहे, जी आपल्या मातृभूमीसाठी लढत आहे. जर हमास ही दहशतवादी संघटना असेल तर नेतान्याहू देखील दहशतवादीच आहेत. आम्ही तुम्हाला जगासमोर 'युद्ध गुन्हेगार' घोषित करतो.'

Recep Tayyip Erdoğan
Israel-Hamas War: इस्रायल-हमास संघर्षात मोठा ट्विस्ट? हमासचे शिष्टमंडळ रशियात दाखल

नेतान्याहू म्हणाले- आता करो या मरो, युद्धाचा दुसरा टप्पा सुरु झाला

एर्दोगन यांच्या टीकेला उत्तर देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, 'इस्रायलकडे "जगातील सर्वात मोठं ''नैतिक बल" आहे.' गाझामध्ये सुरु असलेल्या युद्धादरम्यान नेतान्याहू यांनी करा या मरोची घोषणा देत युद्धाचा दुसरा टप्पा सुरु करण्याची घोषणा केली.

हमासने (Hamas) दक्षिण इस्रायलवर हल्ला सुरु केल्यानंतर तीन आठवड्यांनंतर, इस्रायलने गाझावर आपले हल्ले वाढवले, ज्यात 1,400 हून अधिक लोक मारले गेले. हमासचा खात्मा करणे आणि इस्रायली ओलीसांची सुटका करणे हे आपले प्राधान्य असल्याचे नेत्यान्याहू यांनी म्हटले.

आम्ही देखील तयारी करत आहोत - तुर्की

गाझामधील हमासच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यांमध्ये 7,500 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

शनिवारी पॅलेस्टिनी समर्थकांच्या रॅलीला संबोधित करताना तुर्कीचे अध्यक्ष म्हणाले की, "गाझामध्ये होत असलेल्या नरसंहाराचे मुख्य दोषी पश्चिमकडील देश आहेत". ते पुढे म्हणाले की, "इस्रायल 22 दिवसांपासून खुलेआम युद्ध गुन्हे करत आहे. पाश्चात्य देशांचे नेते इस्रायलला युद्धविराम करण्यास सांगत नाहीयेत."

Recep Tayyip Erdoğan
Israel-Hamas War: हमासने इस्रायलवर का केला हल्ला? जो बायडन यांच्या दाव्यानं खळबळ; वाचा संपूर्ण प्रकरण

पुढे त्यांनी इस्रायलवर ‘युद्ध गुन्हेगार’ असल्यासारखे वर्तन करत पॅलेस्टिनींना नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. एर्दोगन पुढे म्हणाले की, "नक्कीच, प्रत्येक देशाला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. पण या प्रकरणात न्याय कुठे आहे? गाझामध्ये भयानक हत्याकांड घडत आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com