Watch Video: ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलात विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू!

Brazil: ब्राझीलच्या ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये रविवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
Brazil Plane with 12 people crashes and explodes in Rio Branco Acre:
Brazil Plane with 12 people crashes and explodes in Rio Branco Acre:Dainik Gomantak

Brazil Plane with 12 people crashes and explodes in Rio Branco Acre: ब्राझीलच्या ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये रविवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी रिओ ब्रँको येथील मुख्य विमानतळाजवळ हा अपघात झाला. ते एक छोटे विमान होते. अपघातस्थळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

विमानात काही पर्यटक आणि प्रशासनाचे इतर लोक होते असे सांगण्यात येत आहे. गव्हर्नर ग्लॅडसन कॅमेलीच्या प्रेस कार्यालयाने अपघाताला दुजोरा दिला आहे.

मात्र, अपघाताचे (Accident) कारण अद्याप समोर आलेले नाही. अपघातस्थळाच्या आजूबाजूला जंगलात विमानाचे तुकडे पडलेले दिसले. मदत पथक घटनास्थळी तपास करत आहे.

17 सप्टेंबर रोजी झालेल्या विमान अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता

यापूर्वी, 27 ऑक्टोबर रोजी पूर्व विस्कॉन्सिनमधील जंगलात विमान कोसळले होते. ज्यात पायलटला आपला जीव गमवावा लागला होता. त्याचवेळी, 17 सप्टेंबर रोजी अॅमेझॉनच्या जंगलात एका लहान विमानाला अपघात झाला होता. ज्यात विमानातील सर्व 14 जणांचा मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, Ambraer PT-SOG विमानाने Amazonas राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर मानौस येथून उड्डाण केले होते आणि ते मुसळधार पावसामुळे उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर हा अपघात झाला. हे प्रवासी ब्राझीलचे (Brazil) पर्यटक असून ते मासेमारीसाठी जात असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com