Israel Hamas War: आयरन डोमपेक्षा स्वस्त, लक्ष्य देखील अचूक; इस्रायलचे 'हे' नवीन शस्त्र हमाससाठी ठरले धोकादायक

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यापासून युद्ध सुरु आहे, ज्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Israel Hamas War
Israel Hamas WarDainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिन्यापासून युद्ध सुरु आहे, ज्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे.

दरम्यान, इस्रायलने प्रथमच आयरन बीम लेझर गनचा वापर केला असून, हा हमाससाठी चिंतेचा विषय बनला आहे. हे प्रसिद्ध आयरन डोम क्षेपणास्त्रांपेक्षा खूपच स्वस्त असून त्याचा निशाणा अचूक आहे. ही भविष्यातील हवाई संरक्षण यंत्रणाही मानली जाते. या हल्ल्यात हमासचे एक रॉकेट पाडण्यात आले.

युद्धक्षेत्रात लेझर आधारित हवाई संरक्षण प्रणाली प्रथमच वापरण्यात आल्याचे मानले जात आहे. ही प्रणाली शक्तिशाली लेझर लाइटद्वारे कार्य करते आणि मार्गात येणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना नष्ट करते. गेल्या दशकापासून इस्रायल हे शस्त्र तयार करत होता.

2025 पर्यंत ते पूर्णपणे तयार करण्याचे प्रारंभिक उद्दिष्ट होते, परंतु ते नुकतेच पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, त्याचा वापर हमासविरुद्धच केला.

'द सन' ने इस्रायली टीव्ही स्टेशन चॅनल 12 चे संरक्षण रिपोर्टर हॅलेल बिटन रोसेन यांनी सांगितले की, लेझर गनने रॉकेटला यशस्वीरित्या रोखले. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात असे वृत्त आले होते की इस्रायल आयरन बीमची चाचणी घेण्याची योजना आखत आहे.

मात्र, आता त्याची यशस्वी चाचणी झाली आहे. 2024 मध्ये आयरन बीम वापरण्यासाठी पूर्णपणे तयार व्हावे, असे संरक्षण प्रमुखांचे लक्ष्य आहे. या प्रकल्पावर सध्या शंभरहून अधिक अभियंते काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Israel Hamas War
Israel-Hamas War: इस्रायल हल्ल्यात उत्तर गाझा उद्ध्वस्त, अनेक हमास कमांडर ठार; आता पलटवारचा नवा प्लॅन...

दरम्यान, ते काही शंभर मीटरपासून ते अनेक किलोमीटर अंतरापर्यंतच्या धोक्यांना रोखण्यासाठी डिझाइन केलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, आयरन बीमचे 100kW लेसर आणि 7km रेंज म्हणजे ते अचूकतेसह धोके नष्ट करते.

ही यंत्रणा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांपासून (Missiles) संरक्षण देऊ शकत असल्याने, ती जमिनीवर आणि समुद्रात दोन्ही ठिकाणी वापरली जाणार आहे. इन्स्टिटय़ूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीजचे डॉ. येहोशुआ कालिस्की यांना विश्वास आहे की, ही प्रणाली लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होईल.

Israel Hamas War
Israel-Hamas War: हमासच्या 'या' मास्टरमाइंडचा इस्रायल घेतोय वेड्यासारखा शोध, तो का आहे नंबर वन टार्गेट?

याशिवाय, इस्रायलकडे (Israel) इतरही अनेक शस्त्रे आहेत, जी हवाई संरक्षण प्रणालीप्रमाणे काम करतात. एरो 2, एरो 3, डेव्हिड स्लिंग आणि आयरन डोम अशी त्यांची नावे आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे क्षेपणास्त्र संरक्षण तज्ञ उझी रुबिन यांनी सांगितले की, आयरन बीम हा आयरन डोम सिस्टीमचा स्वस्त पर्याय आहे.

आयरन डोमच्या प्रत्येक फायरिंगची किंमत $60,000 आहे, तर एका लेसर बीमची किंमत फक्त काही डॉलर असू शकते. इस्रायलचे आयरन डोम हे जगातील पहिल्या क्षेपणास्त्र इंटरसेप्टर्सपैकी एक आहे. हे 4 किमी ते 70 किमी अंतरावरुन कमी अंतरावरील रॉकेट आणि 155 मिमी तोफखाना नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com