Israel Bahrain Relation
Israel Bahrain RelationDainik Gomantak

अरब देशांमध्ये इस्रायलची एन्ट्री, 'या' इस्लामी देशाशी मैत्रीचा नवा अध्याय सुरु

Israel Bahrain Relation: इस्रायल सातत्याने अरब देशांमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. मध्यपूर्वेतील स्वयंघोषित सर्वात शक्तिशाली सौदी अरेबियाशीही त्याची मैत्री वाढत आहे.
Published on

Israel Bahrain Relation: इस्रायल सातत्याने अरब देशांमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. मध्यपूर्वेतील स्वयंघोषित सर्वात शक्तिशाली सौदी अरेबियाशीही त्याची मैत्री वाढत आहे. इस्रायलचे इतर अनेक अरब देशांशी आधीच चांगले संबंध आहेत.

बहरीन हे यापैकी एक आहे. राजनैतिक संबंध अधिक वाढवण्याच्या उद्देशाने इस्रायलचे परराष्ट्र मंत्री या अरब देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील मैत्रीचा हा नवा अध्याय आहे. इस्रायल येथे आपला नवीन दूतावास बांधत आहे.

दरम्यान, इस्रायलचे (Israel) परराष्ट्र मंत्री एली कोहेन बहरीनच्या नेत्यांची भेट घेतील आणि दूतावासाचे उद्घाटन करतील. इस्रायलने संयुक्त अरब अमिराती, बहरीन, इजिप्त, सुदान आणि मोरोक्को या चार अरब देशांशी द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले आहेत.

या मुस्लिम देशांनी अमेरिकेने आखलेला तथाकथित अब्राहम करार स्वीकारला आहे. याशिवाय, इस्रायलची इजिप्त आणि जॉर्डनशीही चर्चा सुरु आहे. सौदी अरेबियाशीही चर्चा सुरु आहे. मात्र काही प्रकरणांमध्ये अजूनही तोडगा निघने बाकी आहे.

Israel Bahrain Relation
Israel: अल-अक्सा मस्जिद वादावर PM नेत्यान्याहू यांचा मोठा निर्णय; म्हणाले...

पहिल्यांदाच बहरीनचा दौरा

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी अरब देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेषत: ज्या देशाशी इस्रायलचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. कोहेन या उन्हाळ्याच्या सुरुवातीला बहरीनला भेट देणार होते, पंरतु हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

इस्रायली माध्यमांनी सांगितले की, इस्रायलचे संरक्षण मंत्री इतामार बेन-गवीर यांनी जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीला दिलेल्या भेटीमुळे हा विलंब झाला. कोहेन यांचे बहरीनमध्ये (Bahrain) अब्दुललतीफ अल-झयानी यांनी भव्य स्वागत केले.

Israel Bahrain Relation
Israel-Palestine Conflict: आतंकवादाला पाठिंबा देणाऱ्यांची घरे होणार जमीनदोस्त

पॅलेस्टिनींवरील अत्याचार, तरीही इस्रायल-अरब मैत्री वाढत आहे

आज, सोमवारी ते बहारीनच्या नेत्यांना भेटणार असून इस्रायलच्या नव्या दूतावासाचे उद्घाटन करणार आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनने सप्टेंबर 2020 मध्ये इस्रायलसोबत अब्राहम करारावर स्वाक्षरी केली.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अब्राहम कराराला मान्यता देणारा बहरीन हा पहिला देश होता.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नवीन सरकारच्या काळात इस्रायलचे अरब जगाशी संबंध सुधारले आहेत. असे असूनही इस्रायली सैन्य पॅलेस्टाईनवर अत्याचार करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com