Iran-Pakistan Tension: इराणने 'या' घटनेचा बदला घेत पाकिस्तानवर केला क्षेपणास्त्र हल्ला, मारले गेले होते 11 सैनिक

Iran Missile Attack In Pakistan: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत हजारो लोक मरण पावले आहेत.
Iran Missile Attack In Pakistan
Iran Missile Attack In PakistanDainik Gomantak

Iran Missile Attack In Pakistan: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत हजारो लोक मरण पावले आहेत. दुसरीकडे मात्र, दोन्ही इस्लामिक देश आहेत आणि पॅलेस्टाईनसह अनेक मुद्द्यांवर दोघांची मते समान आहेत. तरीही इराणने पाकिस्तानवर इतके वेगवान क्षेपणास्त्र हल्ले का केले, असे प्रश्न विचारले जात आहेत. इराणने बलुचिस्तानमध्ये क्षेपणास्त्र हल्ला करुन दहशतवादी संघटना जैश अल-अदलचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतप्त झाला असून त्याचे परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. अशा स्थितीत इराणने (Iran) इस्लामिक देशावर (पाकिस्तान) इतका भीषण हल्ला का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर महिनाभरापूर्वी घडलेल्या एका घटनेतून मिळते.

वास्तविक, जैश अल-अदल ही सुन्नी विचारधारा असलेली एक दहशतवादी संघटना आहे, ज्याचे इराणशी मतभेद आहेत. त्याने इराणच्या सीमेवर अनेकदा हल्ले केले आहेत आणि इराणच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. पण गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये इराणच्या लष्करावर हल्ला केला, ज्यात 11 लष्करी अधिकारी मारले गेले होते. इराणचे गृहमंत्री अहमद वाहिदी यांनीही याला दुजोरा दिला होता. या दहशतवाद्यांनी (Terrorist) पाकिस्तानच्या पंजगुरमधून हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले होते. या घटनेचा बदला घेण्यासाठीच इराणने हल्ला केल्याचे मानले जात आहे.

Iran Missile Attack In Pakistan
Iran-America Tension: इराणच्या 'सर्वात शक्तिशाली ठिकाणी' मोठा स्फोट, अमेरिकेसोबतचा वाढू शकतो तणाव

दरम्यान, या हल्ल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देण्याबाबत काहीच बोलत नसून केवळ इराणवर हल्ला करत आहे. त्याने इराणला परिणामांची धमकी दिली. पाकिस्तानने म्हटले की, वाटाघाटीसाठी अनेक मार्ग आहेत, परंतु त्याऐवजी हल्ला केला गेला. इराणच्या प्रसारमाध्यमांनी या हल्ल्याबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, मात्र क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. खरे तर, इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर यापूर्वीही अनेकदा चकमकी झाल्या आहेत, मात्र सर्जिकल स्ट्राईकचा हा प्रकार प्रथमच घडला आहे. इराण आणि पाकिस्तान यांच्यात 959 किमी लांबीची सीमा आहे.

पाकिस्तान आणि इराण सीमेवर का भिडतात?

विशेषतः इराणच्या सिस्तान प्रांताला पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची सीमा लागते. सिस्तान प्रांत हा इराणमधील अल्पसंख्याक सुन्नी मुस्लिमांचे आश्रयस्थान आहे, ज्यांची संस्कृती बलुच सारखीच आहे. इराणमध्ये त्यांचा छळ आणि भेदभाव केला जातो, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे, इराणचे म्हणणे आहे की बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत, ज्या आपल्या सीमावर्ती भागांना लक्ष्य करतात. तर पाकिस्तान यास साफ नकार देतो. इराण हा शियाबहुल देश आहे, तर पाकिस्तान सुन्नीबहुल. अशा स्थितीत दोघांमध्ये अनेक गोष्टींवरुन मतभेद आहेत.

Iran Missile Attack In Pakistan
Afghanistan Iran Tensions: सीमेवर गोळीबार, मृत्यूचे दावे आणि एकमेकांवर आरोप; तालिबान- इराणमध्ये घमासान

जैश अल-अदल इराणवर का नाराज आहे?

जैश अल-अदल ही दहशतवादी संघटना 2012 मध्ये स्थापन झाली होती. याच्या नावाचा अर्थ 'न्यायाची सेना' असा होतो. ही दहशतवादी संघटना बलुचिस्तानच्या भागात सक्रिय असून इराणच्या सिस्तान प्रांताच्या सीमेवरील सुरक्षा दलांना लक्ष्य करत आहे. या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केल्यानंतर इराणने दोन अड्डे उद्ध्वस्त केल्याचे म्हटले आहे. इराण आणि पाकिस्तानमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत, परंतु दोघांमधील राजनैतिक संबंधही पूर्ववत झाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com