VIDEO: कोटींच्या फायटर जेटला लाखांच्या ड्रोननं छळलं! 'इराणी शाहेद'नं अमेरिकेच्या बाहुबली F-15 ला चारली धूळ; 'टार्गेट हिट'चा थरारक व्हिडिओ व्हायरल

Iranian Shahed-136 Drone vs US F-15: अमेरिकेचा 'बाहुबली' मानल्या जाणाऱ्या F-15 फायटर जेटला इराकच्या आकाशात इराणच्या एका छोट्याशा ड्रोनने मोठी चपराक लगावली.
Iranian Shahed-136 Drone vs US F-15
Iranian Shahed-136 Drone vs US F-15Dainik Gomantak
Published on
Updated on

Iranian Shahed-136 Drone vs US F-15: जगातील सर्वात शक्तिशाली आणि अमेरिकेचा 'बाहुबली' मानल्या जाणाऱ्या F-15 फायटर जेटला इराकच्या आकाशात इराणच्या एका छोट्याशा ड्रोनने मोठी चपराक लगावली. इराणच्या शाहेद-136 या आत्मघाती ड्रोनला पाडण्यासाठी गेलेले अमेरिकन फायटर जेट वारंवार चकमा खाताना दिसले, ज्याचा व्हिडिओ आता इराणच्या सरकारी 'प्रेस टीव्ही'ने जारी केला. या घटनेमुळे जागतिक स्तरावर अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञानाची मोठी नाचक्की होत असून आधुनिक युद्धतंत्रावर नवी चर्चा सुरु झाली.

इराणच्या (Iran) प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, अमेरिकन वायू सेनेचे अत्यंत वेगवान F-15 जेट इराकच्या आकाशात शाहेद ड्रोनचा पाठलाग करत आहे. मात्र, हे अत्याधुनिक फायटर जेट त्या ड्रोनला रोखण्यात किंवा पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. शाहेद ड्रोनने अत्यंत कमी उंचीवरुन उडत या बलाढ्य विमानाला हुलकावणी दिली आणि शेवटी इराकमधील आपल्या निश्चित लक्ष्यावर जाऊन धडक दिली. इराणचा दावा आहे की, उत्तर इराकच्या एरबिल भागात असलेल्या एका ब्रिटीश कंपनीच्या तेल सुविधेला या ड्रोनने यशस्वीरित्या लक्ष्य केले, त्यानंतर परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.

Iranian Shahed-136 Drone vs US F-15
US Iran War: 'तुमची लढाई तुम्ही लढा, अमेरिका मदतीला येणार नाही!'; इराण युद्धावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिटनसह 'नाटो' देशांवर संताप

या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही यंत्रणांच्या किमतीतील तफावत. अमेरिकेच्या (America) एका F-15 फायटर जेटची किंमत साधारणपणे 80 ते 100 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर इराणचा एक शाहेद-136 ड्रोन अवघ्या 16 ते 20 लाख रुपयांत तयार होतो. कोट्यवधी रुपयांचे विमान एका स्वस्त ड्रोनसमोर हतबल झाल्याचे पाहून संरक्षण तज्ज्ञही अवाक झाले. शाहेद ड्रोन हे रडारच्या टप्प्यात लवकर येत नाहीत आणि त्यांचा वेग कमी असल्याने वेगवान फायटर जेट्सना त्यांना हवेत टिपणे कठीण जाते.

Iranian Shahed-136 Drone vs US F-15
US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. इराण या घटनेचा वापर आपल्या लष्करी सामर्थ्याचा प्रचार करण्यासाठी करत असून महागड्या युद्धनौका आणि विमानांपेक्षा स्वस्त ड्रोन तंत्रज्ञान कोणत्याही महासत्तेला गुडघे टेकण्यास भाग पाडू शकते, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले. सोशल मीडियावर या 'आसमानी युद्धाचा' व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून अमेरिकेच्या हवाई सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com