आण्विक कार्यक्रमासंदर्भात (nuclear program) जागतिक शक्तींसोबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, इराणकडून (Iran) लवकरच एक अंतराळ मोहीम (space mission) सुरु होण्याची शक्यता आहे. एका सॅटेलाइट फोटोंच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इराणच्या इमाम खोमेनी स्पेस सेंटरमध्ये (Imam Khomeini Space Center) संभाव्य प्रक्षेपणाशी संबंधित माहिती अशा वेळी आली आहे, जेव्हा इराणच्या राज्य माध्यमांनी इस्लामिक रिपब्लिकच्या नागरी अंतराळ कार्यक्रमासाठी आगामी नियोजित उपग्रह प्रक्षेपणांची यादी सादर केली. इराणचे अर्धसैनिक रिव्होल्यूशनरी गार्ड त्याचा समांतर कार्यक्रम चालवते. ज्याने गेल्या वर्षी यशस्वीरित्या उपग्रह कक्षेत सोडला होता. तेहरानच्या (Tehran) कार्यक्रमांवर देखरेख करणारे मिडलबरी सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे तज्ज्ञ जेफ्री लुईस (Jeffrey Lewis) म्हणाले की, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी (Ibrahim Raisi) यांच्यemu संबंधित तज्ञ प्रयत्न करत असून कदाचित त्यांच्या मनात काहीतरी नवीन चालू असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जेफ्री लुईस पुढे म्हणाले की, जर्मनीच्या नव्या परराष्ट्रमंत्र्यांनी इशारा दिला आहे की, आमच्यासाठी वेळ संपत आहे. परंतु हे सर्व इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या कार्यक्रमाच्या नूतनीकरणावर जगाचे लक्ष केंद्रित होत आहे. इराणचे माजी अध्यक्ष हसन रुहानी, ज्यांनी अणु करारास आपल्या कार्यक्रमामधून काढून टाकले होते.
इराणने अण्वस्त्रांचा दावा फेटाळला
इराण अण्वस्त्रे बनवू इच्छित असल्याचे सातत्याने नाकारत आला आहे. तो सातत्याने म्हणत आला आहे की, आम्हाला शांततापूर्ण हेतूंसाठी आण्विक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवायचे आहे. दुसरीकडे मात्र अण्वस्त्रे विकसित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांची पाश्चात्य देशांना चिंता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) 2015 च्या अणुकरारावर पुन्हा चर्चा करु इच्छित आहेत. बायडन यांना इराणच्या आण्विक कार्यक्रमाची (Iran Nuclear Programme) गती कमी करायची आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.