Iran Helicopter Crash: इराणमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर अणुकेंद्राजवळ कोसळलं! पायलटसह 4 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

Iranian Air Force Training Flight Crash: अमेरिकेसोबत सुरु असलेल्या तणातणी दरम्यान इराणसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली.
Iran Helicopter Crash
Iranian Air Force Training Flight CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Iran Military Helicopter Crash Isfahan: अमेरिकेसोबत सुरु असलेल्या तणातणी दरम्यान इराणसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. मंगळवारी (24 फेब्रुवारी) इराणच्या मध्यवर्ती भागात लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात इस्फहान प्रांतातील दोर्चेह शहरात एका गजबजलेल्या भाजी मार्केटमध्ये झाला, ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

इराणच्या (Iran) अधिकृत टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात राजधानी तेहरानपासून दक्षिणेला सुमारे 330 किलोमीटर अंतरावर झाला. ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर कोसळले, तो परिसर लष्करी आणि धोरणात्मकदृष्ट्या इराणसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण इराणचा प्रमुख हवाई तळ आणि अणुकेंद्र याच इस्फहान प्रांतात स्थित आहे.

Iran Helicopter Crash
Iran USA War Impact: तेलाचे दर ते सायबर अटॅक! इराण-अमेरिका संघर्षाने जगासमोर उभ्या ठाकणार 'या' 6 समस्या

विशेष म्हणजे, ज्या इस्फहान प्रांतात हा अपघात झाला, तेच ठिकाण इराण-इस्रायल संघर्षादरम्यान चर्चेत आले होते. गेल्या जून महिन्यात अमेरिकेने इराणच्या याच अणुकेंद्राला लक्ष्य केले होते, त्यासोबतच फोर्दो आणि नतान्ज यांसारख्या महत्त्वाच्या न्यूक्लियर साईट्सवरही हल्ले करण्यात आले होते. अशा संवेदनशील क्षेत्रात लष्करी हेलिकॉप्टरचा झालेला अपघात इराणच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे.

इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर एका नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते आणि उड्डाण सुरु असतानाच तांत्रिक बिघाडामुळे ते थेट बाजारपेठेत कोसळले. या अपघाताचा जो व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये बाजारपेठेतून धुराचे लोट उठताना आणि हेलिकॉप्टरचा पडलेला ढिगारा स्पष्टपणे दिसत आहे.

Iran Helicopter Crash
America Iran Tension: "तुमच्या युद्धनौकांना समुद्रात गाडून टाकू!" ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर खामेनेईंचा पलटवार; इराणची अमेरिकेला थेट विनाशाची ताकीद

या भीषण दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलट आणि को-पायलट यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, हेलिकॉप्टर थेट गजबजलेल्या बाजारपेठेत कोसळल्याने जमिनीवर असलेल्या सामान्य नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला.

इराणच्या निमसरकारी वृत्तसंस्थेनुसार, बाजारपेठेत असलेल्या दोन स्थानिक नागरिकांचा या अपघातात बळी गेला आहे. गेल्या आठवडाभरातील ही दुसरी मोठी विमान दुर्घटना आहे. काही दिवसांपूर्वीच इराणच्या पश्चिम भागात असलेल्या हमदान शहरात एका 'एफ-4' लढाऊ विमानाला अपघात झाला होता, ज्यामध्ये एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे इराणच्या हवाई ताकदीच्या देखभालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Iran Helicopter Crash
Iran Protest: इराणमध्ये संघर्षाचा भडका!! भारतीयांना तातडीने देश सोडण्याचे आदेश; परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली 'हाय-अलर्ट' अ‍ॅडव्हायझरी

इराणमधील या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांच्या वाढत्या संख्येमागे पाश्चात्य देशांनी लादलेले कठोर निर्बंध हे एक प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. या निर्बंधांमुळे इराणला विमानांचे स्पेअर पार्ट्स आणि आधुनिक तंत्रज्ञान मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या इराणचे लष्कर आणि व्यावसायिक विमान कंपन्या अनेक दशके जुन्या विमानांवर आणि हेलिकॉप्टर्सवर अवलंबून आहेत. जुनाट ताफा आणि दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याची कमतरता यामुळे इराणमध्ये अशा प्राणघातक अपघातांचा इतिहास राहिला आहे. अमेरिकेसोबतचा (America) वाढता संघर्ष आणि देशांतर्गत तांत्रिक समस्या अशा दुहेरी पेचात सध्या इराण अडकलेला दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com