VIDEO: ट्रम्प यांची उडाली झोप अन् पेंटागॉन हादरलं! इराणी माऱ्यात महासत्तेचं 'A-10' विमान खाक; होर्मुझच्या आकाशात रचला मृत्यूचा सापळा

Iran Claims US A-10 Warthog Shot Down: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका धोकादायक वळणावर पोहोचला आहे.
Iran Claims US A-10 Warthog Shot Down
Iran Claims US A-10 Warthog Shot DownDainik Gomantak
Published on
Updated on

Iran Claims US A-10 Warthog Shot Down: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता एका धोकादायक वळणावर पोहोचला आहे. 'अल जजीरा'ने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालानुसार, इराणी सैन्याने असा दावा केला की, त्यांच्या सैनिकांनी अमेरिकेचे 'ए-10' (A-10) हे जमिनीवर हल्ला करणारे लढाऊ विमान यशस्वीरित्या पाडले.

ही घटना अशा वेळी समोर आली जेव्हा शुक्रवारी पश्चिम आशियात अमेरिकेचे दुसरे एक लढाऊ विमान कोसळल्याच्या बातम्या विविध माध्यमांतून येत होत्या. या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे आखाती देशांमधील लष्करी हालचालींना वेग आला असून संपूर्ण क्षेत्रात युद्धाचे ढग गडद झाले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, इराणी सूत्रांनी या विमानाबद्दल आणि घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली असली तरी, अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय 'पेंटागॉन' किंवा 'व्हाईट हाऊस'ने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विमानाची सद्यस्थिती किंवा इराणच्या दाव्यातील सत्यता यावर अमेरिकेकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

Iran Claims US A-10 Warthog Shot Down
Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

इराणची वृत्तसंस्था 'तसनीम'च्या हवाल्याने अल जजीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे हे 'ए-10' विमान सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीच्या (Strait of Hormuz) परिसरात पाडण्यात आले. इराणी सैन्याच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले की, सामुद्रधुनीच्या दक्षिण भागात आणि आसपासच्या जलक्षेत्रात या विमानाला लक्ष्य करण्यात आले.

जरी या दाव्याची अद्याप कोणत्याही त्रयस्थ किंवा बाह्य स्त्रोताकडून पुष्टी झालेली नसली, तरी ज्या विमानाचा उल्लेख केला जात आहे ते 'ए-10' विमान अमेरिकेच्या हवाई दलाचे एक महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. हे विमान विशेषतः जमिनीवरील लक्ष्यांना टार्गेट करण्यासाठी आणि हवाई साहाय्य मोहिमांसाठी डिझाइन केलेले आहे. रणगाडे, चिलखती वाहने आणि जमिनीवरील शत्रू सैन्याविरुद्ध अत्यंत प्रभावी कामगिरी बजावण्यासाठी या विमानाचा जगभरात नावलौकिक आहे.

Iran Claims US A-10 Warthog Shot Down
Iran US War: इराणच्या 'स्वदेशी' शक्तीपुढे सुपरपॉवरचा थरकाप! अमेरिकेचे 850 कोटींचे F-35 फायटर जमीनदोस्त; नव्या एअर-डिफेन्स सिस्टिमने दाखवली ताकद

याच दरम्यान इराणमध्ये घडलेल्या एका वेगळ्या घटनेने अमेरिकेची चिंता वाढवली आहे. 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या (Iran) भूभागावर कोसळलेल्या अमेरिकेच्या 'एफ-15 ई स्ट्राईक ईगल' लढाऊ विमानातील एका क्रू मेंबरला वाचवण्यात अमेरिकन सैन्याला यश आले. वाचवण्यात आलेला हा जवान सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. मात्र, या विमानातील दुसऱ्या क्रू मेंबरबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. बेपत्ता असलेल्या या दुसऱ्या जवानाचा शोध घेण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम (Search and Rescue Operation) राबवली जात आहे.

Iran Claims US A-10 Warthog Shot Down
US Iran War: होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तरी युद्ध संपवण्याची तयारी; इराणची लष्करी ताकद नष्ट करण्यासाठी ट्रम्पचा 'मास्टर प्लॅन'!

एकूणच, होर्मुज सामुद्रधुनीतील विमानाचा पाडाव आणि एफ-15 विमानाचा अपघात यामुळे आखाती प्रदेशात अनिश्चिततेचे वातावरण आहे. इराणचा दावा जर खरा ठरला, तर हे थेट अमेरिकेच्या लष्करी ताकदीला दिलेले आव्हान ठरेल. दुसरीकडे, बेपत्ता वैमानिकाचा शोध घेणे हे अमेरिकेसमोर मोठे आव्हान असून या घटनांमुळे निर्माण झालेला तणाव येणाऱ्या काळात आशियाई राजकारणावर आणि जागतिक सुरक्षिततेवर मोठा परिणाम करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या (America) मौनामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले असून दोन्ही देशांच्या पुढील हालचालींकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com