France Protest: ''हा तर फ्रान्सवर ताबा मिळवण्याच्या मोठ्या कटाचा भाग'', वाढत्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प यांचं खळबळजनक विधान; पॅरिससह प्रमुख शहरात अराजकता

Donald Trump Statement on France Protest: फ्रान्समध्ये शिक्षण क्षेत्रासाठी अतिरिक्त निधीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आता अत्यंत हिंसक आणि उग्र वळणावर पोहोचले आहे.
Donald Trump Statement on France Protest
Donald Trump Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Donald Trump Statement on France Protest: फ्रान्समध्ये शिक्षण क्षेत्रासाठी अतिरिक्त निधीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आता अत्यंत हिंसक आणि उग्र वळणावर पोहोचले आहे. पॅरिससह फ्रान्समधील अनेक प्रमुख शहरांमध्ये सुरु असलेल्या या निदर्शनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. मंगळवारी देशभरात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अडीच लाखांहून अधिक नागरिक रस्त्यावर उतरले होते.

आंदोलनाला हिंसक रुप मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि बळाचा वापर करावा लागला. मार्से, नांत, टूलूज, स्ट्रासबर्ग, लिओन आणि रेनेस या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि तोडफोड सुरु असून रस्ते पूर्णपणे जाम झाले आहेत.

Donald Trump Statement on France Protest
Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक आणि महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. त्यांनी 'ट्रूथ सोशल'वर पोस्ट करत म्हटले की, फ्रान्समधील ही निदर्शने केवळ शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या मागण्यांपुरती मर्यादित नसून, हा मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या स्थलांतराचा आणि धार्मिक असंतुलनाचा परिणाम आहे. फ्रान्सवर ताबा मिळवण्याच्या एका मोठ्या कटाचा हा भाग असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

Donald Trump Statement on France Protest
Donald Trump Coin Controversy: अमेरिकेच्या चलनावर 'डोनाल्ड ट्रम्प'! 1 डॉलरच्या नव्या नाण्यावरुन गदारोळ; काय सांगतो अमेरिकन कायदा?

सध्याच्या गंभीर परिस्थितीमुळे फ्रान्स सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने दोन हजारांहून अधिक शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत, तर एक हजारांहून अधिक शाळांचे कामकाज ऑनलाइन माध्यमातून सुरु ठेवण्याची वेळ आली आहे. सरकार आंदोलकांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असले, तरी आंदोलक कोणतीही तडजोड किंवा चर्चा करण्यास तयार नसल्याने संपूर्ण फ्रान्समध्ये तणावाचे वातावरण कायम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com